गाईचं दूध काढण्यासाठी महिलेची अनोखी शक्कल, देशी जुगाडचा Video Viral

जुगाड(Desi Jugaad)चे अनेक व्हिडिओ (Video) तुम्ही पाहिले असतील. आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, ते पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेप्रमाणे डॉक्टर, इंजिनीअर किंवा शास्त्रज्ञही अशा जुगाडचा विचार करू शकत नाहीत.

गाईचं दूध काढण्यासाठी महिलेची अनोखी शक्कल, देशी जुगाडचा Video Viral
देशी जुगाड, गाईचं दूध काढताना महिला

जुगाड(Desi Jugaad)चे अनेक व्हिडिओ (Video) तुम्ही पाहिले असतील. काही व्हिडिओ पाहून तुम्हीही जुगाड करणाऱ्या व्यक्तीचं कौतुकही केलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, ते पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेप्रमाणे डॉक्टर, इंजिनीअर किंवा शास्त्रज्ञही अशा जुगाडचा विचार करू शकत नाहीत.

गायीचं वासरू बनवून गायीसमोर बसवलं

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की ती महिला आपल्या गायीचं दूध काढण्यासाठी अनोखाच जुगाड करते. त्या महिलेनं जो जुगाड केला त्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल. गाईचं दूध काढण्यासाठी महिलेनं आपल्या मुलाला गायीचं वासरू बनवून गायीसमोर बसवलं.

वासरू मानून चाटते

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की गाय त्या मुलाला आपलं वासरू मानते आणि त्याला चाटत आहे. महिला दूध काढताना दिसत आहे. गाईचं वासरू मेलं तर दूध देणं बंद होतं, हे तुम्हाला माहीत असेलच. अशा परिस्थितीत अनेकजण इंजेक्शनचा आधार घेतात. या महिलेनं तर अतिशय अनोखी पद्धत शोधलीय. आता हा व्हिडिओ पाहू या…

इंजेक्शनपेक्षा मुलाला वासरू बनवणं चांगलं…

गायीचं दूध काढण्यासाठी महिलेनं अवलंबलेला जुगाड तुम्ही क्वचितच ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. सोशल मीडिया यूझर्स व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत, तर बहुतांश लोक महिलेच्या या जुगाडचं कौतुक करत आहेत. दूध काढण्यासाठी इंजेक्शन देण्यापेक्षा आपल्या मुलाला वासरू बनवणं चांगलं, असं लोक म्हणत आहेत.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर

व्हिडिओमध्ये गायीचे वासरू बनलेलं मूलही खूप आनंदी दिसतंय. @rakeshbhatialw नावाच्या यूझरनं हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. यूझरनं शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनवरून हा व्हिडिओ राजस्थानचा असल्याचं कळतं. व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 700हून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Video : कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचं शौर्य पाहून अभिमानानं फुलेल तुमची छाती

Video : तीन दिवसांपासून कानात शिरलं होतं झुरळ! डॉक्टरांनाही कळलं नाही काय झालं, अखेर…

Viral : 10 वर्षाची चिमुरडी आहे दोन कंपन्यांची मालकीण; महिन्याला कमावतेय कोट्यवधी रुपये, वाचा सविस्तर

Published On - 4:55 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI