Viral : 10 वर्षाची चिमुरडी आहे दोन कंपन्यांची मालकीण; महिन्याला कमावतेय कोट्यवधी रुपये, वाचा सविस्तर

वयाच्या 10व्या वर्षी एखादं मूल किती मोठं काम करू शकतं याची तुम्ही कल्पना करू शकता? एका मुलीनं एक आदर्श घालून दिला आहे, ती फक्त 10 वर्षांची आहे, पण एवढ्या कमी वयात ही मुलगी दोन कंपन्यांची मालक आहे.

Viral : 10 वर्षाची चिमुरडी आहे दोन कंपन्यांची मालकीण; महिन्याला कमावतेय कोट्यवधी रुपये, वाचा सविस्तर
पिक्सी
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 1:03 PM

वयाच्या 10व्या वर्षी एखादं मूल किती मोठं काम करू शकतं याची तुम्ही कल्पना करू शकता? फार तर तुम्ही त्यांच्या खट्याळपणाचा अंदाज लावू शकता. तुम्ही अशी कल्पना करू शकता, की त्याच्याकडे काही प्ले स्टेशन गेम असेल, जो त्यानं काही स्टेप्स पार करत साध्य केला असेल किंवा तो स्मार्ट फोनवर गेम खेळत असेल आणि त्यानं PUBGमध्ये प्रभुत्व मिळवलं असेल. पण प्रत्येक मूल असं नसतं. याचीही काही उदाहरणं आहेत. एका मुलीनं असाच एक आदर्श घालून दिला आहे, ती फक्त 10 वर्षांची आहे, पण एवढ्या कमी वयात ही मुलगी दोन कंपन्यांची मालक आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आज आम्ही तुम्हाला तिचीच कहाणी सांगत आहोत.

पहिल्या 48 तासांत विकली गेली सर्व खेळणी

पिक्सी कर्टिस असं या मुलीचं नाव असून ती ऑस्ट्रेलियाची आहे. तिनं आपली आई रॉक्सी जेसेन्को यांच्या मदतीनं एक कंपनी सुरू केली. Pixie’s Fidgets असं या कंपनीचं नाव आहे. गेल्या वर्षी ही कंपनी सुरू करण्यात आली. ती या कंपनीची सीईओ आहे. ही खेळणी विकणारी कंपनी आहे, लोकांना त्यांचं काम खूप आवडलंय. जेव्हा त्यांनी कंपनी सुरू केली, तेव्हा पहिल्या 48 तासांत त्यांची सर्व खेळणी विकली गेली.

हेअर अॅक्सेसरीजचीही कंपनी

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की ती फक्त एक कंपनी नाही. तर याआधीही ते बिझनेस कंपनी चालवत आहेत. ज्याचं नाव Pixie’s bows आहे. ही कंपनी हेअर अॅक्सेसरीज विकते. ती खूप लहान असताना तिच्या आईनं तिच्या नावानं ही कंपनी सुरू केली. आता पिक्सी कंपनी लहान मुलांसाठी खेळणेही विकते.

15व्या वर्षी निवृत्ती घेईल?

आपण जर पिक्सीच्या मागच्या महिन्याच्या कमाईबद्दल बोललो, तर ती कमाई 1 कोटी 4 लाख रुपयांपेक्षा जास्त होती. त्यांच्या कंपनीच्या खेळण्यांना मागणी इतकी जास्त आहे, की ते बाजारात येताच ग्राहक त्यांची खरेदी करतात. त्यांची मुलगी वयाच्या 15व्या वर्षी निवृत्ती घेईल, अशी शक्यता तिचे पालक व्यक्त करत आहेत. इतक्या कमी वयात निवृत्त होणारी ती पहिलीच मुलगी असेल.

View this post on Instagram

A post shared by Pixie Curtis (@pixiecurtis)

इन्स्टावर १ लाखांहून अधिक फॉलोअर्स

पिक्सी सध्या अभ्यास करत नाही, असं नाही. ती अजूनही शाळेत शिकते, तिच्या भावासोबत ती मर्सिडीज कारनं शाळेत जाते. या कारची किंमत 1.40 कोटी रुपये आहे. तिच्याकडे 49.72 कोटी रुपयांचं आलिशान घरही आहे. इन्स्टावर तिचे १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे एक लहान मुलगी एवढी मोठी कंपनी कशी चालवत आहे आणि त्यातून ती भरपूर पैसे कमावते आहे आणि इतरांनाही प्रेरणा देत आहे, हे आपण पाहिलं.

Viral : माझ्या रस्त्याच्या आड येवू नको, असंच म्हणतोय जणू ‘हा’ कुत्रा! पाहा, दगड हटवतानाचा Video

चोरट्यानं ‘असा’ हिसकावला प्रवाशाचा मोबाइल! ‘हा’ Viral Video पाहून तुम्हीही व्हा सावध

बसच्या धडकेतून बचावला स्कूटरचालक! काळजाचा थरकाप उडवणारा हा Viral Video पाहा

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.