चोरट्यानं ‘असा’ हिसकावला प्रवाशाचा मोबाइल! ‘हा’ Viral Video पाहून तुम्हीही व्हा सावध

सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत काय बघायला नाही मिळत? इथं एकापेक्षा एक व्हिडिओ (Video) समोर येतात, जे येताच इंटरनेटवर वेगानं व्हायरल होतात. एक व्यक्ती स्टेशनवर दुसऱ्या व्यक्तीच्या हातातून फोन हिसकावून घेतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय.

चोरट्यानं 'असा' हिसकावला प्रवाशाचा मोबाइल! 'हा' Viral Video पाहून तुम्हीही व्हा सावध
चोरानं हिसकावला मोबाइल
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 12:13 PM

सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत काय बघायला नाही मिळत? इथं एकापेक्षा एक व्हिडिओ (Video) समोर येतात, जे येताच इंटरनेटवर वेगानं व्हायरल होतात. चोरीचे किस्से अनेकदा तुम्ही सर्वांनी पाहिले असतील, ऐकले असतील. तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तेव्हा हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. जसं की बस स्टँड, मार्केट, शॉपिंग मॉल किंवा रेल्वे स्टेशन. या सर्व ठिकाणी चोरीच्या घटना अधिक प्रमाणात दिसून येतात. आता याच प्रकारातला एक व्हिडिओ समोर आलाय. एक व्यक्ती स्टेशनवर दुसऱ्या व्यक्तीच्या हातातून फोन हिसकावून घेतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ट्रेन स्टेशनवर थांबली तेव्हा

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रेल्वे स्टेशनचा आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रेनच्या दारात उभी राहून फोनवर बोलत असल्याचं दिसतंय. तर ट्रेनही स्टेशनवर थांबली आहे. त्या व्यक्तीभोवती अनेक लोक फिरत असतात. मग काही वेळानं जेव्हा ट्रेन सुरू होणार असते तेव्हा चोरी करणारी व्यक्ती ट्रेनमध्ये चढते आणि काही क्षणांनी लगेच उतरते. ट्रेनचा वेग वाढताच ती व्यक्ती ट्रेनमधून उतरते आणि फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीच्या जवळ येते.

‘असा’ हिसकावला फोन

व्हिडिओमध्ये पुढे असे दिसून येतं, की जेव्हा ती व्यक्ती फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीकडे येते तेव्हा तो आपल्या दोन्ही हातांनी फोन अधिक वेगाने खेचून पळून जातो आणि भिंतीवर उडी मारून पळून जातो. तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक घटना पाहिल्या असतील. काही यूझर्सनी तर हे स्वत: अनुभवलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. haq_se_engineers नावाच्या पेजवर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता.

‘हे अजिबात अपेक्षित नव्हतं’

हा व्हिडिओ आतापर्यंत 60 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. यावर लोकांनी आपल्या कमेंट्सही शेअर केल्या आहेत. व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्सबद्दल बोलताना एका यूझरनं कमेंट करत लिहिलंय, हे अजिबात अपेक्षित नव्हतं. दुसर्‍या यूझरनं लिहिलं, की याला म्हणतात संधीचा फायदा घेणं. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक हसणारे इमोजीही शेअर करत आहेत.

Viral : माझ्या रस्त्याच्या आड येवू नको, असंच म्हणतोय जणू ‘हा’ कुत्रा! पाहा, दगड हटवतानाचा Video

जीव धोक्यात घालून महिलेची सिंहिंणींसोबत सैर, जंगलातला Video Viral

Viral Video : भल्या मोठ्या सापाला आपल्या ओंजळीनं पाजलं पाणी, यूझर्स म्हणतायत…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.