जीव धोक्यात घालून महिलेची सिंहिंणींसोबत सैर, जंगलातला Video Viral

एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) होतोय. यात एक महिला सिंहिणीं(Lionesses)सोबत जाताना दिसतेय. सहा सिंहिणींसोबत जंगलात फिरतानाचा हा व्हिडिओ आहे.

जीव धोक्यात घालून महिलेची सिंहिंणींसोबत सैर, जंगलातला Video Viral
सिंहिणीच्या मागे धावणारी महिला

एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) होतोय. यात एक महिला सिंहिणीं(Lionesses)सोबत जाताना दिसतेय. सहा सिंहिणींसोबत जंगलात फिरतानाचा हा व्हिडिओ आहे. ते तिचे पाळीव प्राणी असल्यासारखे भासत आहे. या व्हिडिओमध्ये सिंहिणींसोबत मागे फिरणारी महिला कॅमेऱ्यात कैद झालीय. शेवटच्या फ्रेममध्ये एका सिंहिणीची शेपटी धरून चालत असताना ती महिला दिसतेय.

हल्ला करत नाही

या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे यातील एकही सिंहिण त्या महिलेवर किंवा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करत नाही. या जंगली आणि अत्यंत धोकादायक अशा प्राण्यांच्या मागे ती महिला अगदी आनंदानं फिरताना दिसतेय. या व्हिडिओला कॅप्शनही दिलंय, की Do One Thing Every Now & Then That Scares The Life Out Of You. Would You Try This? जिवनात भीती वाटणाऱ्या गोष्टी करायला हव्यात. तुम्ही हे ट्राय केलंत?

इन्स्टाग्रामवर पोस्ट

@safarigallery या यूझरनं इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला असून तो आता व्हायरल होत आहे. 1.39 लाखांहून अधिक वेळा तो पाहिला गेलाय. तर 6,000हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. आपला जीव धोक्यात घालणाऱ्या महिलेला पाहून नेटिझन्सना आश्चर्य वाटतंय.

‘मृत्यूला बोलावण्यासारखं’

एका यूझरनं म्हटलंय, की व्हिडिओ शूट करणाऱ्याचा अभिमान वाटतो. एकानं लिहिलंय, घाबरवणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे एखादवेळी मृत्यूला बोलावण्यासारखं आहे. त्यामुळे नाही.. तर अजून एकजण म्हणतो, की सोबत चालणं चांगलंय पण हे प्राणी जंगली होत नाहीत, तोपर्यंतच. त्यामुळे जंगली प्राण्यांपासून दूरच राहायला हवं, असाही रोख यूझर्सचा दिसतो.

ऑटोवाल्या भैयाचा हा देशी जुगाड पाहिला का? Viral Video पाहून यूझर्स म्हणतायत, वाह! क्या सीन है!

Video : अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला सहदेव दिरदो, ‘बचपन का प्यार’ फेम कलाकारानं काय म्हटलं, पाहा…

Viral : 100हून जास्त भुसुरूंग शोधण्यास मदत करणाऱ्या कंबोडियातल्या मगावा उंदराचा मृत्यू, वाचा सविस्तर

Published On - 11:22 am, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI