Video : कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचं शौर्य पाहून अभिमानानं फुलेल तुमची छाती

गुडघ्यापर्यंत बर्फात उभा असलेला लष्करी जवानाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral)झालेला तुम्ही पाहिला असेलच. आता असाच एक व्हिडिओ समोर आलाय. तो पाहून तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमानही वाटेल.

Video : कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचं शौर्य पाहून अभिमानानं फुलेल तुमची छाती
हॉलिबॉल खेळताना भारतीय जवान

कोणत्याही संकटात आपल्या सर्व लष्करी जवानां(Jawan)नी आपल्या देशासाठी केलेलं कार्य, मग ते शून्य तापमानात लढणं असो किंवा भयंकर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करणं… हिमवादळासारख्या परिस्थितीत गुडघ्यापर्यंत बर्फात उभा असलेला लष्करी जवानाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral)झालेला तुम्ही पाहिला असेलच. तो व्हिडिओ पाहून तमाम भारतीय नागरिकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. आता असाच एक व्हिडिओ समोर आलाय. तो पाहून तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमानही वाटेल.

लक्षवेधक

सध्या भारतीय जवानांचा आणखी एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. लष्कराचे जवान कडाक्याच्या थंडीशी झुंज देताना आणि बर्फात व्हॉलिबॉल खेळताना दिसत होते. या व्हिडिओचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. या व्हिडिओमधली खास गोष्ट म्हणजे तो कडाक्याच्या थंडीशी फक्त लढणं नाही तर त्याचा आनंदही घ्यायला शिकवत. या थंडीत भल्याभल्यांची प्रकृती बिघडते, पण भारतीय जवानांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

ट्विटरवर शेअर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन संघात विभागलेले भारतीय सैनिक व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहेत. एका संघानं गुण मिळताच एकमेकांना टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. दुसरीकडे, कडाक्याच्या थंडीतही ते उभे असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ शेअर करणारे IAS अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘सर्वोत्तम हिवाळी खेळ’ आमचे जवान’. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे आणि 144.8kपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

Viral Video : उंटाची छेड काढणं मुलाला पडलं महाग; यूझर्स म्हणतात, हे तर कर्माचं फळ!

Video : तीन दिवसांपासून कानात शिरलं होतं झुरळ! डॉक्टरांनाही कळलं नाही काय झालं, अखेर…

Viral : 10 वर्षाची चिमुरडी आहे दोन कंपन्यांची मालकीण; महिन्याला कमावतेय कोट्यवधी रुपये, वाचा सविस्तर

Published On - 4:17 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI