Viral Video : उंटाची छेड काढणं मुलाला पडलं महाग; यूझर्स म्हणतात, हे तर कर्माचं फळ! 

कर्माबाबत इंटरनेटवर अनेक व्हिडिओ (Video) आहेत, जे येताच व्हायरल होतात. आता या एपिसोडमध्ये एक मजेदार व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एका मुलाला त्याच्या कर्माचं फळ लगेच मिळते. कसं ते पाहा...

Viral Video : उंटाची छेड काढणं मुलाला पडलं महाग; यूझर्स म्हणतात, हे तर कर्माचं फळ! 
उंट

‘काम करा, फळाची इच्छा नको’ अशी एक म्हण तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस कर्मा(Karma)चं फळ मिळतं, असं अनेकदा म्हटलं जातं. माणूस चांगली आणि वाईट दोन्ही कर्म करतो आणि वाईट कर्मांचे परिणाम त्याला भोगावे लागतात. प्रत्येकाला वाईट कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. कधीकधी लोकांना त्यांच्या वाईट कर्माचं फळ लगेच मिळतं. आता कर्माबाबत इंटरनेटवर अनेक व्हिडिओ (Video) आहेत, जे येताच व्हायरल होतात. आता या एपिसोडमध्ये एक मजेदार व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एका मुलाला त्याच्या कर्माचं फळ लगेच मिळते. कसं ते पाहा…

एखाद्याला त्रास देणं म्हणजे…

एखाद्याला त्रास देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे, असं तुम्ही ऐकलं असेलच. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच दृश्य दिसतंय. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की रस्ता दिसतोय. अनेक लोक आपापल्या कामात गुंतले आहेत, तसेच काही लोक त्या रस्त्यावरून जात आहेत. व्हिडिओमध्ये एक उंटही रस्त्यावर येताना दिसतोय.

याला म्हणतात कर्माचं फळ

या रस्त्यावरून एक उंट येतोय. तर एक मुलगा त्या रस्त्यावरून दुसऱ्या बाजूला जातो. उंटावरून पुढे जाताच तो मुलगा उंटाच्या पायाला हात लावून ओढण्याचा प्रयत्न करतो. पण अशा वेळी तो उंट त्याच पायानं मुलाला लाथ मारतो. त्याचवेळी मुलगा मोठा आवाज करत पळून जातो. हा व्हिडिओ खरोखर कर्माचं योग्य उदाहरण आहे. या व्हिडिओला लोकांनी लाइक्स केलंय. तर कमेंट्स करून शेअरही केलाय.

ट्विटर अकाउंटवरून शेअर 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. तुम्ही Susanta Nanda IFSच्या पेजवर व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, कर्मा. याविषयी एका यूझरनं लिहिलंय, हे कर्म आहे. आणखी एका यूझरनं लिहिलंय, शेवटी, लोक मुक्या प्राण्यांना चिडवून त्रास का देतात? आतापर्यंत या व्हिडिओला हजारोहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइकही केलं आहे.

Published On - 3:36 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI