Viral Video : स्विमिंग पुलाजवळ अंघोळीसाठी बसलंय अस्वल, लोक म्हणतायत आम्हीही येतो..!

सोशल मीडिया(Social Media)वर अनेक प्रकारच्या प्राण्यां(Animals)चे व्हिडिओ (Videos) पाहायला मिळतात. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक अस्वल स्विमिंग पूलच्या काठावर बसलेलं दिसतंय.

Viral Video : स्विमिंग पुलाजवळ अंघोळीसाठी बसलंय अस्वल, लोक म्हणतायत आम्हीही येतो..!
अस्वल

सोशल मीडिया(Social Media)वर अनेक प्रकारच्या प्राण्यां(Animals)चे व्हिडिओ (Videos) पाहायला मिळतात. आपण अस्वलाबद्दल बोललो तर तो एक अतिशय भयानक प्राणी आहे. मात्र, सोशल मीडियावर तुम्हाला अस्वलाशी संबंधित अनेक मजेदार व्हिडिओही पाहायला मिळतील. आता कल्पना करा, की एक अस्वल स्विमिंग पूलच्या बाजूला बसून आनंद घेत आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच तुम्हाला चांगलं वाटेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक अस्वल स्विमिंग पूलच्या काठावर बसलेलं दिसतंय. इतकंच नाही तर तो तिथं बसलेल्या लोकांना इशारा करून बोलावतोय.

अंघोळीसाठी बोलावतोय

सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ आवडीनं पाहिले जातात. असे व्हिडिओ पाहून लोक त्यांचा ताण कमी करतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक अस्वल लोकांना अतिशय स्विमिंग पूलमध्ये अंघोळीसाठी आमंत्रित करत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ सर्वांनाच खूप आवडलाय. तसंच लोक लाइक्स आणि कमेंट्सद्वारे भरभरून प्रेम देत आहेत.

ट्विटर अकाउंटवर शेअर

व्हायरल व्हिडीओमध्ये एक अस्वल लोकांना हाक मारत असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडिओ पाहून लोक हसत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मीम्सवर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही buitengebieden_ नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनवर हजारो कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

‘बेहद शानदार, ज़िंदाबाद’

या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरनं लिहिलंय, की किती सुंदर व्हिडिओ आहे. दुसर्‍या यूझरनं लिहिलंय, की बेहद शानदार, ज़िंदाबाद.. तिसऱ्या यूझरनं लिहिलंय, हे अस्वल खरोखरच अप्रतिम आहे. याशिवाय आणखी एकानं लिहिलंय, अस्वल अनेकदा अशी सुंदर कामं करताना दिसतात. बहुतेक लोकांनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये इमोजीही शेअर केले आहेत.

गाईचं दूध काढण्यासाठी महिलेची अनोखी शक्कल, देशी जुगाडचा Video Viral

Baby Shark Doo Doo | तब्बल 10 बिलियन Views घेणारा पहिला YouTube Video, असं काय ग्रेट आहे काय व्हिडीओत?

Video : कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचं शौर्य पाहून अभिमानानं फुलेल तुमची छाती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI