Pune MHADA lottery| पुणे म्हाडा लॉटरीची आज सोडत ! तब्बल 4 हजार 222 नागरिकांना मिळणार स्वतःची घरे 

| Updated on: Jan 07, 2022 | 7:00 AM

महाडच्या लॉटरीची ऑनलाईन पद्धतीने सोडत झाल्यानंतर, घरे मिळालेल्या नागरिकांना म्हाडाकडून अधिकृत एसएमएस पाठवून माहिती दिली जाणार आहे. या4 हजार 222 घरांमध्ये म्हाडाच्या विविध योजनतील2823 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक योजनअंतर्गत 1399 सदनिकांचा समावेश आहे.

Pune MHADA lottery| पुणे म्हाडा लॉटरीची आज सोडत ! तब्बल 4 हजार 222 नागरिकांना मिळणार स्वतःची घरे 
Mhada
Follow us on

पुणे – पुणे म्हाडासाठी तब्बल 4 हजार 222 घरांसाठीच्या लॉटरीची आज सोडत होत आहे. या लॉटरीसाठी तब्बल 80  हजार 848   नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यातील तब्बल 65 हजार 180 लोकांनी त्यासाठीची अनामत रक्कम भरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं या लॉटरीची सोडत केली जाणार आहे.

कोरोना नियमावलीमुळे ऑनलाईन सोडत
कोरोना व ओमिक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे जिल्हात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळेच पुणे म्हाडाच्या साडेचार हजार घरांची लाॅटरी ऑनलाईन काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली आहे. ऑनलाईन सोडतीच्या वेळी अर्जदारांना युट्युब व फेसबुक लाईव्हद्वारे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती राहता येणार आहे.

2  टक्क्यातील फ्लॅट उपलब्ध
वाढते शहरीकरण व सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने दीड वर्षात तीन वेळा हजारो घरांची लॉटरीची सोडत केली आहे. यासाठी पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. याचाच परिणाम म्हणजे शहरातील नामांकित बिल्डर च्या प्रकल्पामध्ये नागरिकांना घरे मिळली आहेत.

नागरिकांना एसएमएसद्वारे देणार माहिती

महाडच्या लॉटरीची ऑनलाईन पद्धतीने सोडत झाल्यानंतर, घरे मिळालेल्या नागरिकांना म्हाडाकडून अधिकृत एसएमएस पाठवून माहिती दिली जाणार आहे. या4 हजार 222 घरांमध्ये म्हाडाच्या विविध योजनतील2823 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक योजनअंतर्गत 1399 सदनिकांचा समावेश आहे. या घरांच्या नोंदणीचा शुभारंभही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला होता.

बुमराहसारखी एक्शन असलेल्या 22 वर्षाच्या घातक गोलंदाजाने वनडे क्रिकेटमधून घेतला ‘ब्रेक’

शिवसैनिकांनीच शिवसेनेचे पोस्टर फाडले! राणेंच्या बालेकिल्ल्यात असं का घडलं?

Manda Mhatre | भाजप आमदार मंदा म्हात्रेंची लवकरच घरवापसी? जयंत पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण