Manda Mhatre | भाजप आमदार मंदा म्हात्रेंची लवकरच घरवापसी? जयंत पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण

Manda Mhatre | भाजप आमदार मंदा म्हात्रेंची लवकरच घरवापसी? जयंत पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण
मंदा म्हात्रे आणि जयंत पाटील यांच्या भेटीदरम्यानचा फोटो

मंदा म्हात्रे आणि जयंती पाटील यांच्या भेटीमुळे आता राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या मंदा म्हात्रे या पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत की, अशी कुजबूज ऐकायला मिळतेय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 06, 2022 | 7:30 PM

मुंबई : भाजप आमदार मंदा म्हात्रे (BJP MLA Manda Mhatre) राष्ट्रवादी कार्यालयात (NCP Office) गेल्या. तिथं त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेटही घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं नसतं, तरच नवल! झालंही अगदी तसंच.

भेटीत काय घडलं?

भाजप आमदार मंदा म्हात्रे या खरंतर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मधल्या काळात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्याच्या भाजप प्रवेशाची चर्चाही जोरात रंगली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा मंदा म्हात्रे या बऱ्याच काळानंतर पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयात गेल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे. या भेटीदरम्यान, त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत बातचीत केली. या वेळी झालेल्या चर्चेत नेमकं काय झालं, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. दरम्यान, मंदा म्हात्रे यांनी विकासकामांसाठी भेट घेतली असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

मंदाताईंची घरवापसी?

मंदा म्हात्रे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे आता राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या मंदा म्हात्रे या पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत की काय, अशी कुजबूज ऐकायला मिळतेय. मात्र याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मात्र येत्या काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं या भेटीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचंय.

नवी मुंबईत म्हात्रे विरुद्ध नाईक आमनासामना?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मंदा म्हात्रे यांनी भाजपचेत आमदार असलेल्या गणेश नाईकांवर निशाणा साधला होती. रुग्णालय उभारणीच्या कामावरुन त्यांनी भाजपच्या आमदारावर निशाणा साधल्यामुळे नवी मुंबईत भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे दिसून आलं होतं. त्यामुळे मंदा म्हात्रे यांची पुढची राजकीय दिशा नेमकी काय ठरते, याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें