मोठी बातमी ! राष्ट्रवादीला पुण्यात भगदाड? 12 माजी नगरसेवक शिंदे गटात?; 30 तारखेनंतर मोठ्या घडामोडी घडणार

| Updated on: Jan 25, 2023 | 2:40 PM

पुणे आणि ठाण्यातील नगरसेवक फुटीच्या चर्चा सुरू असतानाच येत्या 30 तारखेनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे 30 जानेवारीनंतर काय घडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी ! राष्ट्रवादीला पुण्यात भगदाड? 12 माजी नगरसेवक शिंदे गटात?; 30 तारखेनंतर मोठ्या घडामोडी घडणार
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: एकीकडे पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे इंदापूरातील 12 माजी नगरसेवक शिंदे गटाच्या मागावर आहेत. शिंदे गटात हे नगरसेवक आजच प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. तर पुणे जिल्ह्यात शिंदे गटाला मोठं बळ मिळालं आहे.

इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या 12 माजी नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी या नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तंबूत प्रचंड खळबळ उडाली आहे. मनपा निवडणुकीपूर्वीच शिंदे गटाचं मिशन नगरसेवक सुरू झालं आहे.

हे सुद्धा वाचा

या मिशनमुळे विरोधी पक्षाला सर्वच महापालिकांमध्ये हादरे बसू लागले आहेत. विशेष म्हणजे या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा भाजप ऐवजी शिंदे गटाकडे अधिक ओढा आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याने विरोधी पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.

ठाण्यातही 25 नगरसेवक वाटेवर

पुण्यातच नव्हे तर ठाणे आणि कळव्यातही राष्ट्रवादीचे 25 माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुंब्र्यात पोस्टर्स लागले होते.

मुंब्र्यात सर्व काही अलबेल नाही

या पोस्टर्सवर राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांचे फोटो होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो होता. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे या बॅनर्सवर फोटो नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर?

एवढेच नव्हे तर नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी शेरोशायरी केली होती. या शेरोशायरीतून त्यांनी नजीब मुल्ला यांना थेट शिंदे गटात येण्याचं आवतन दिलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा रंगली होती.

30 जानेवारीनंतर बड्या घडामोडी

दरम्यान, पुणे आणि ठाण्यातील नगरसेवक फुटीच्या चर्चा सुरू असतानाच येत्या 30 तारखेनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे 30 जानेवारीनंतर काय घडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाच्या गळाला कोणता बडा नेता लागणार? याचे तर्कवितर्कही लढवले जात आहेत.