Tanaji Sawant : रुग्णाची तक्रार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत एक्शन मोडमध्ये, कालच्या टीकेनंतर सक्रिय, पोहचले थेट ससून हॉस्पिटलात

| Updated on: Aug 28, 2022 | 10:18 PM

रुग्णांची सेवा हेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र, ग्रामीण भागातील रुग्ण दाखल होताच त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हा प्रकार सावंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट ससून रुग्णालय गाठले. शिवाय आरोग्य सेवेऐवेजी कॅबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली.

Tanaji Sawant : रुग्णाची तक्रार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत एक्शन मोडमध्ये, कालच्या टीकेनंतर सक्रिय, पोहचले थेट ससून हॉस्पिटलात
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अचनाक ससून हॉस्पीटलला भेट देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली
Follow us on

पुणे : शिवसेनेतील बंडापासून ते आता मंत्रीपद मिळेपर्यंत भूम-परंडा-वाशी मतदार संघाचे (Tanaji Sawant) आमदार तानाजी सावंत हे चर्चेत राहिलेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा दौरा कार्यक्रम समोर आला होता. यामध्ये पुणे कार्यालय ते घर आणि घर ते कार्यालय एवढाच काय तो त्यांचा दौरा असल्याने (Social Media) सोशल मिडियावर सावंत हे टीकेचे धनी झाले होते. त्यानंतर आज लागलीच ते एक्शन मोडमध्ये आल्याचे पाहवयास मिळाले. ग्रामीण भागातील रुग्णाने तक्रार करताच आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे थेट (Sasun Hospital) ससून रुग्णालयात दाखल झाले होते. एवढेच नाहीतर अचानक त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील कारभाराची पाहणी केली. अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले तर रुग्णांना कशाप्रकारे सेवा दिली जाते याचीही पाहणी केली. शिवाय ज्या रुग्णाने तक्रार केली होती त्याचे प्रश्नही निकाली काढले. कालपर्यंत बालाजी नगर येथील कार्यालय ते घर असाच दौरा असणारे आरोग्यमंत्री आज थेट ससून रुग्णालयात दाखल झाले होते.

वेळेत उपचार होत नसल्याची तक्रार

ससून रुग्णालयात दाखल झालेल्या ग्रामीण भागातील रुग्णावर वेळेत उपचार होत नाहीत अशी तक्रार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे आली होती. यापूर्वीही त्यांच्या मतदार संघातील रुग्ण पुण्यात उपचार घेत असताना सावंत हे थेट रुग्णालयात दाखल झाले होते. त्याच प्रमाणे रविवारीही रुग्णाला उपचारासाठी एका तासापेक्षा अधिकचा वेळ घेतला जात आहे. शिवाय यावर कुणाचाच अंकुश नसल्याने संबंधित रुग्णाने थेट सावंत यांच्याशीच संपर्क केला. तत्परता दाखवत अवघ्या काही वेळेत सावंत हे ससून रुग्णालयात दाखल झाले होते.

अधिकाऱ्यांचीही झाडाझडती

रुग्णांची सेवा हेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र, ग्रामीण भागातील रुग्ण दाखल होताच त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हा प्रकार सावंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट ससून रुग्णालय गाठले. शिवाय आरोग्य सेवेऐवेजी कॅबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. शिवाय सर्वकाही अनपेक्षित होत असल्याने रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची चांगलीच धांदल उडाली.

..म्हणून सावंत कायम चर्चेत

शिवसेनेतील बंडापासून तानाजी सावंत हे चर्चेत राहिलेले आहेत. ते गुवाहटीला असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांचे पुण्यातील कार्यलय हे फोडले होते. तर त्यावर संतप्त झालेले सावंत सोशल मिडियात चर्चेत होते. त्यानंतर कोण आदित्य ठाकरे असाही त्यांनी उल्लेख केल्यानंतर नेटकऱ्यांच्या ते रडावर होते तर आता पावसाळी अधिवेशन दरम्यान विरोधकांनी आरोग्य विभागाच्या कारभाराचे दर्शन घडवून आणल्यानंतर उत्तर देताना त्यांची झालेली पंचाईत चर्चेत राहिलेली आहे. तर शनिवारी त्यांचा दौरा हा बालाजी नगर ते घर असाच कायम असल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. काल टीका झाल्यानंतर आज लागलीच सावंत एक्शन मोडमध्ये आले आहेत.