निसर्गाचा चमत्कार की विज्ञानाला आव्हान? दुधाच्या पिशवीपेक्षाही कमी वजनाच्या मुलीचा जन्म; कुठे घडली ही घटना?

| Updated on: Jan 07, 2023 | 10:09 AM

शिवन्याची प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाली असून तिची प्रकृती चांगली आहे. ही भारतातील पहिलीच घटना आहे. साधारणपणे वेळेच्या आधी मुलं जन्मण्याची शक्यता फारच कमी असते.

निसर्गाचा चमत्कार की विज्ञानाला आव्हान? दुधाच्या पिशवीपेक्षाही कमी वजनाच्या मुलीचा जन्म; कुठे घडली ही घटना?
निसर्गाचा चमत्कार की विज्ञानाला आव्हान? दुधाच्या पिशवीपेक्षाही कमी वजनाच्या मुलीचा जन्म
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: पुण्याच्या चाइल्ड केअर रुग्णालयात केवळ 400 ग्रॅम वजन असलेल्या मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचं नाव शिवन्या असं आहे. अवघ्या 25 आठवड्यात म्हणजे सहाव्या महिन्यात या मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचं वजन दुधाच्या अर्धा लिटर पिशवीच्या वजना एवढच असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा निसर्गाचा चमत्कार आहे की विज्ञानाला आव्हान आहे अशी चर्चा आता रंगली आहे. इतक्या कमी वयाच्या वजनाची मुलगी जन्माला आल्याने तिचं नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

शिवन्याचा जन्म खूप लवकर झाला. ही प्रिमॅच्युअर डिलिव्हरी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिवन्या ही भारतातील सर्वात छोटी आणि कमी वजनाची मुलगी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शिवन्या आणि तिच्या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिवन्या तिच्या आई-वडिलांसोबत वाकडला राहतो. तिची प्रकृती चांगली असल्याचंही सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

शिवन्याचा जन्म 21 मे 2022 रोजी झाला होता. प्रिमॅच्युअर डिलिव्हरी असल्याने तिला 94 दिवसांसाठी डॉक्टरांनी निगरानी खाली ठेवलं होतं. त्यानंतर 23 ऑगस्ट 2022 रोजी तिला डिस्चार्ज देण्यता आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा तिचं वजन 2,130 ग्रॅम (2 किलो 13 ग्रॅम) होतं.

अत्यंत कमी वजन असल्याने या मुलीच्या जगण्याची शक्यता फारच कमी होती. तिची जगण्याची शक्यता 0.5 टक्के होती. ज्या मुलांचा जन्म प्रेग्नंसीच्या 37 ते 40 आठवड्यानंतर होतो, त्यांचं वजन कमीत कमी 2,500 ग्रॅम (2.5 किलो) पर्यंत असतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. आता शिवन्या हेल्दी नवजात बालकांसारखी आहे. तिचं वजन 4.5 किलो झालं आहे. ती जेवणही करते, असं शिवन्याच्या वडिलांनी स्पष्ट केलं.

याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. पुण्याच्या सूर्या मदर अँड चाइल्ड केअर रुग्णालयाचे चीप नोनटोलॉजिस्ट डॉ. सचिन शाह यांनी यावर टाइम्सकडे प्रतिक्रिया दिली. प्रेग्नंसी पीरियड आणि जन्माच्या वेळेचं वजन एकत्र केल्यास शिवन्या ही खूपच छोटी आहे.

शिवन्याची प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाली असून तिची प्रकृती चांगली आहे. ही भारतातील पहिलीच घटना आहे. साधारणपणे वेळेच्या आधी मुलं जन्मण्याची शक्यता फारच कमी असते, असं शाह यांनी सांगितलं.

आईमध्ये जन्मजात असमानता असल्याने शिवन्याचा जन्म आधी झाला. प्रेग्नंसीच्यावेळी शिवन्याच्या आईला दोन गर्भाशय होते. डबल गर्भाशय असणं ही खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. दोन गर्भाशय असल्यामुळेच शिवन्याचा जन्म वेळेच्या आधी झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.