पुणे-बंगळुरु महामार्गावरून प्रवास करताय?, ही बातमी वाचा, अन्यथा ट्रॅफिकमध्ये अडकाल…

| Updated on: Oct 04, 2022 | 10:29 AM

पुणे-बंगळुरु महामार्गावरून ट्रॅफिकही जास्त असतं. अशात आज जर तुम्ही या महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावरून प्रवास करताय?, ही बातमी वाचा, अन्यथा ट्रॅफिकमध्ये अडकाल...
Follow us on

अभिजीत पोते, प्रतिनिधी, TV9 मराठी, पुणे : पुणे-बंगळुरु महामार्गावरून (Pune Bangalore Highway) प्रवास करणाऱ्यां प्रवाशांची संख्या जास्त आहे. या महामार्गावर ट्रॅफिकही जास्त असतं. अशात आज जर तुम्ही या महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज हा महामार्ग दोन तासांसाठी बंद असणार आहे. तुमचा दोन तास खोळंबा (Pune Bangalore Highway Traffic) होऊ शकतो.

1 ऑक्टोबरला पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला. या पाडकामानंतर काही भागात रस्त्याच्या बाजूला खडक तसेच आहेत. ते खडक आज फोडण्यात येणार आहेत. आज रात्री साडेअकरा ते दीड या दोन तासात हे काम केलं जाणार आहे. त्यामुळे या दोन तासात हा महामार्ग बंद असणार आहे. यावेळेत जर तुम्ही या महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागू शकतो.

पुणे-बेंगलोर महामार्गावर आज दोन तास वाहतूक बंद असणार आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर आज रात्री दोन तासांचा ब्लॉक असणार आहे. मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा ब्लॉक असणार आहे.

पर्यायी मार्ग

हा महामार्ग बंद असल्याने या मार्गावरची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. मुंबई ते सातारा हा मार्ग बंद असल्याने वाहन चालकांनी वाकड ते शिवाजीनगर आणि तिथून कात्रजपर्यंत येण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणारा चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर आता इथे नवा पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल 112 मीटरचा असेल. हे काम पूर्ण व्हायला आणखी सहा महिने लागण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये या पुलाचं काम पूर्ण होऊ शकतं. नव्याने उभारण्यात येणाऱ्या पूल आणि भुयारी मार्गाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. पण काही ठिकाणचं जमीन हस्तांतरण रखडल्यानं या कामाला उशीर होत आहे. सध्या दिलाश्याची बाब म्हणजे 2 सर्व्हिस रोड येत्या 7 सात दिवसात तयार होणार आहे.