Pune water : येती राष्ट्रपती घरा, घरोघरी पाण्याचा झरा; राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पुण्यातला पाणीबंदीचा निर्णय मागे!

| Updated on: May 25, 2022 | 5:18 PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे सर्व भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. गुरुवारी राष्ट्रपतींचा मुक्काम पुण्यात असणार आहे.

Pune water : येती राष्ट्रपती घरा, घरोघरी पाण्याचा झरा; राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पुण्यातला पाणीबंदीचा निर्णय मागे!
पुण्यातली पाणीबाणी रद्द
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यात गुरुवारी नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या दौऱ्यामुळे पाणी बंदचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. पर्वती, लष्कर, एसएनडीटी, वारजे पाणीपुरवठा झोन अंतर्गत दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणारा पाणीपुरवठा (Water supply) सुरू राहणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे सर्व भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. गुरुवारी राष्ट्रपतींचा मुक्काम पुण्यात असणार आहे. शुक्रवारी बालगंधर्व रंगमदिरात दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर महापालिकेचा (PMC) भर असणार आहे.

राष्ट्रपतींचा पुणे दौरा

गुरुवारी संध्याकाळी 7 वाजून10 मिनिटांनी राष्ट्रपतींचं विमानतळावर आगमन होणार आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी दुपारी 12 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील

‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार होता बंद

पर्वती जलकेंद्र विभाग म्हणजेच पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग

अंतर्गत शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्रमांक 42, 46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

हे सुद्धा वाचा

लष्कर जलकेंद्र पंपिंग

या भागांतर्गत लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.

चतु:श्रृंगी-एस.एन.डी.टी. – वारजे जलकेंद्र परिसर

याअंतर्गत भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रस्ता परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरूड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाइन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.