Pune : राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दौऱ्यावर, लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

प्रदीप कापसे

| Edited By: |

Updated on: May 25, 2022 | 7:36 AM

यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार 2022  वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.

Pune : राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दौऱ्यावर, लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
Image Credit source: TV9

पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ramnath kovind) गुरुवारी पुणे (Pune) दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेतला जातोय. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Pune Collector) यांनी सर्व विभागांची बैठक घेतली आहे. गुरुवारी राष्ट्रपतींचा मुक्काम पुण्यात असणार आहे. शुक्रवारी बालगंधर्व रंगमदिरात दगडूशेठ हलवाई गणती मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजून10 मिनीटांनी राष्ट्रपतींचं विमानतळावर आगमन होणार आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी दुपारी 12 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार 2022

यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार 2022  वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आहे. यावेळी उद्यानकृषी क्रांतीच्या जनक आणि डॉ. डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरीच्या प्र-कुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ डॉ. प्राजक्ता काळे यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दत्तमंदिराच्या 125 वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लक्ष्मीदत्त या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशीही माहिती कदम जहागिरदार यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

सर्व विभागांचा आढावा

राष्ट्रपतींच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेतला जातोय. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व विभागांची बैठक घेतली आहे. गुरुवारी राष्ट्रपतींचा मुक्काम पुण्यात असणार आहे. शुक्रवारी बालगंधर्व रंगमदिरात दगडूशेठ हलवाई गणती मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजून10 मिनीटांनी राष्ट्रपतींचं विमानतळावर आगमन होणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI