मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा शैलेश शिंदे भाजपचा माजी पदाधिकारी?

| Updated on: Jun 22, 2021 | 1:25 PM

मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून शिंदेंनी गृह विभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. (Shailesh Shinde who threatened to blow up Mantralaya with a bomb was bjp activist sources)

मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा शैलेश शिंदे भाजपचा माजी पदाधिकारी?
मंत्रालय
Follow us on

पुणे : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्याप्रकरणी आरोपी शैलेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस पुढील कारवाई करत आहेत. मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा शैलेश शिंदे हा आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. (Shailesh Shinde who threatened to blow up Mantralaya with a bomb was bjp activist sources)

मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून शिंदेंनी गृह विभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. संध्याकाळी ईमेल मिळाल्यानंतर तातडीची पावलं उचलत पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या शैलेश शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

तब्बल 150 ई-मेल, लक्ष वेधून घेण्यासाठी धमकीचा मेल

शैलेश शिंदे यांचा मुलगा पुण्यातील वानवडी परिसरातील हॅचिंग्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतो आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन फी आणि इतर मुद्दयावर त्यांच्या मुलाला देत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक, शिक्षणमंत्री यांना तब्बल 150 ई-मेल केले होते. मात्र त्यावर उत्तर न आल्याने त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी धमकीचा मेल केल्याचं शिंदे यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे.

शैलेश शिंदेंला पुणे पोलिसांनी काल अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आरोपी शिंदे यांनी मुलाला शाळेत अॅडमिशन न मिळाल्याने आणि वारंवार पुण्यातील हॅचिंग्स या शाळेकडून त्रास होत असल्याने त्यांनी धमकीचा मेल पाठविल्याचेही कुटुंबाकडून सांगण्यात येतं आहे.

शिंदेंचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय

शिंदे हे पुण्यातील घोरपडीच्या बि.टी.कवडे रोड परिसरातील इस्टर्न कोर्ट या इमारतीत राहतात. ते सध्या शहरात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करताय. शिंदे यांचा मुलगा पाचवी पासून हाचिंग्स या शाळेत शिकत होता. आता तो दहावीत आहे. (Shailesh Shinde who threatened to blow up Mantralaya with a bomb was bjp activist sources)

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल, संतापाचे धागेदोरे पुण्यातील शाळेपर्यंत, पालकांचा आरोप काय?

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं

पोलिसी खाक्या, भर शिवाजी चौकात बुलेटच्या 114 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवला, तरुणांना चांगलाच धडा