पुण्यात कुठल्या पक्षाकडून लढणार? वसंत मोरे यांनी दिले संकेत

| Updated on: Mar 19, 2024 | 6:21 PM

वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली असली तरी त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते कदाचित शरद पवार गटात प्रवेश करतील, असा अंदाज वर्तवला जात होता. या दरम्यान त्यांनी आज महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

पुण्यात कुठल्या पक्षाकडून लढणार? वसंत मोरे यांनी दिले संकेत
vasant more
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

पुणे | 19 मार्च 2024 : मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले नेते वसंत मोरे यांनी मोठा दावा केला आहे. पुण्यात महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच “पुण्यात महाविकास आघाडीकडून मला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे”, असंदेखील वसंत मोरे म्हणाले आहेत. कदाचित महाविकास आघाडीच्या दुसऱ्या यादीत पुण्याचं नाव असेल, असं वसंत मोरे म्हणाले आहेत. “महाविकास आघाडीचं आताचं वातावरण पुणेच नाही, तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. मला वाटतं की महाविकास आघाडी जिंकून येऊ शकते”, असं वसंत मोरे म्हणाले.

“ऑलरेडी मी लंगोट लावलेलं आहे. मी लंगोट लावून मैदानात उतरलो आहे. फक्त आता मला कोणत्या दिशेने कोणता डाव टाकायचा ते मी थोड्या दिवसांत ठरवेल. मला शंभर टक्के भाजपला चितपट करायचं आहे”, अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली. “मला वाटतं की, महाविकास आघाडीच्या दुसऱ्या यादीत आपल्या पुण्याचा विचार होऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

“मनसेच्या प्रश्नावर मी उत्तर देऊ शकत नाही. पक्ष संघटना आहे, पक्षाचे नेते आहेत, पुण्यातील मनसेच्या नेत्यांना याबाबत विचारावं. ते नेते त्याबाबत उत्तर देतील”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

‘ते तुम्हाला 4 जूनला कळेल’

“मी अमित ठाकरे यांच्यासाठी पुण्याची जागा मोकळी केली होती. अमित ठाकरे पुण्यातून निवडणूक लढवणार असतील तर मी आताच माघार घेतो. मला वाटतं मी घेतलेला निर्णय योग्य कसा होता आणि योग्य का आहे? ते तुम्हाला 4 जूनला कळेल. लोकसभा निवडणुकीचा 4 जूनला निकाल आहे. हा निकाल सांगेल की, वसंत मोरेने घेतलेली भूमिका योग्य होती की चुकीची होती”, अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली.