Pune crime : केकचे पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला अन् 1.6 लाख रुपये गमावले; पिंपरी चिंचवडमधल्या महिलेची ऑनलाइन फसवणूक

| Updated on: Aug 03, 2022 | 3:33 PM

नलाइन व्यवहार करताना फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नका, कोणताही व्यवहार करण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Pune crime : केकचे पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला अन् 1.6 लाख रुपये गमावले; पिंपरी चिंचवडमधल्या महिलेची ऑनलाइन फसवणूक
ऑनलाइन फसवणूक, प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : केकचे पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन (Scans QR code) करणाऱ्या महिलेने 1.6 लाख रुपये गमावले आहेत. मार्च महिन्यात ही घटना घडली होती. पिंपरी चिंचवड परिसरात ही धक्कादायक घटना आणि फसवणुकीचा (Cheating) प्रकार समोर आला आहे. मोशी येथून 400 रुपयांचा केक एका 30 वर्षीय महिलेने ऑनलाइन मागविला. फसवणूक करणाऱ्याने क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले आणि त्यानंतर या महिलेचे तब्बल 1.67 लाख रुपये डेबिट झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार (Complaint in cyber cell) दाखल केली होती. प्राथमिक तपासानंतर सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी बँकेत हे पैसे ट्रान्सफर झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना लक्षात आले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे.

भोसरीतील प्रकार

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले, की संबंधित महिलेला केक पाठवायचा असल्याने ती परिसरातील केक शॉपचे नंबर्स शोधत होती. त्यात तिने एक दुकान निवडले आणि 4 मार्च रोजी 400 रुपये किंमतीचा केक ऑर्डर केला. त्यानंतर तिने ऑनलाइन पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला, पण हो होऊ शकला नाही. समोरील व्यक्तीने तिला एक QR कोड सेंड केला आणि तो स्कॅन करून पेमेंट करण्याची विनंती केली. तिने QR कोड स्कॅन केला तेव्हा 400 रुपयांचा व्यवहार झाला.

अकाऊंट केले रिकामे

या पहिल्या व्यवहारानंतर लगेचच तिच्या बँक खात्यातून इतर अनेक व्यवहार झाले. काही तासांतच सायबरक्रूकने तिचे बँक खाते 1.67 लाख रुपये ट्रान्सफर करून रिकामे केले, असे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले, की आमच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे, की पैसे दुसऱ्या राज्यातील खासगी बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आम्ही बँकेकडून अधिक तपशील मागितले आहेत. आमची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचे आवाहन

ऑनलाइन व्यवहार करताना फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नका, कोणताही व्यवहार करण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधत असल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्यात वेळ लागू शकतो, अशावेळी फसवणूक झालेल्याला मनस्ताप सहन करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.