Nashik | ग्राहकांच्या तक्रारींचे होणार जलद निवारण, 30 डिसेंबरला डाक अदालत; 15 डिसेंबरपर्यंत सादर करा अर्ज

| Updated on: Dec 12, 2021 | 7:05 AM

डाक विभागातर्फे ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी 30 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Nashik | ग्राहकांच्या तक्रारींचे होणार जलद निवारण, 30 डिसेंबरला डाक अदालत; 15 डिसेंबरपर्यंत सादर करा अर्ज
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः डाक विभागातर्फे ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी 30 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ग्राहकांनी 15 डिसेंबर 2021 पूर्वी वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन नाशिक डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे. डाक विभागाचा आता फक्त पत्रापुरता संबंध नसतो. त्यामुळे डाक विभागाबाबत ग्राहकांच्या असंख्य तक्रारी असतात. त्यामुळेच नाशिक डाक विभागातील ग्राहकांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दीर्घ काळापासून ज्या ग्राहकांच्या समस्या सुटल्या नाहीत, त्यावर मार्ग काढण्यात येणार आहे.

तर तक्रारीची दखल

डाक अदालतीत पंजीकृत टपाल, स्पीड पोस्ट, बचत बँक, मनी ऑर्डर इत्यादींबाबत असणाऱ्या तक्रारींचा समावेश असणार आहे. याबरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील पोस्टल सेवेविषयी असणाऱ्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल या डाक अदालतीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे, असे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी कळविले आहे.

येथे होणार डाक अदालत

डाक विभागामार्फत ग्राहकांना अनेक सेवा देण्यात येत असून, ग्राहकांना याबाबत काही अडचण असल्यास त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी अशा डाक अदालतीचे आयोजन करण्यात येत असते. याकरिता वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग, मुख्य डाक घर जवळ, त्र्यंबक रोड नाशिक येथे दुपारी 4 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीत सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुक ग्राहकांनी पोस्टल सेवेविषयी तक्रार सादर करतांना दोन प्रतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे.

ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी 30 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ग्राहकांनी 15 डिसेंबर 2021 पूर्वी वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावे.

-मोहन अहिरराव, प्रवर डाक अधीक्षक, नाशिक डाक विभाग

इतर बातम्याः

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा!

Nashik | महा कृषी ऊर्जा अभियानाची यशोगाथा, जळगाव परिमंडळात 5819 शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीजजोडण्या

ST Strike: मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे मुघलशाही, पडळकरांची परबांवर टीका; करोडोंच्या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप