शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू धानोरकरांच्या कार्यालयावर आयकर छापे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आयकर विभागाकडून छापे टाकले जात आहेत. नुकतेच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू धानोरकर यांच्या प्रचार कार्यालयावरही आयकर विभागाने छापे टाकले. मतदानाच्या एक दिवस आधी झालेल्या या कारवाईमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या छाप्यांचा काँग्रेसने निषेध केला आहे. भाजपला आपला पराभव दिसत असल्यानेच त्यांच्याकडून दहशत पसरवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते […]

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू धानोरकरांच्या कार्यालयावर आयकर छापे
Follow us on

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आयकर विभागाकडून छापे टाकले जात आहेत. नुकतेच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू धानोरकर यांच्या प्रचार कार्यालयावरही आयकर विभागाने छापे टाकले. मतदानाच्या एक दिवस आधी झालेल्या या कारवाईमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या छाप्यांचा काँग्रेसने निषेध केला आहे.

भाजपला आपला पराभव दिसत असल्यानेच त्यांच्याकडून दहशत पसरवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आयकर विभागाने आज स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या माहितीवरून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपूर येथील प्रचार कार्यालयावर छापा टाकला. यात प्रचार साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याचा आरोप काँग्रसने केला आहे. या छाप्यात काहीही आक्षेपार्ह साहित्य मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित छाप्याची कारवाई आपल्या निवासस्थानी आणि तेथेच असलेल्या प्रचार कार्यालयात घडल्याची माहिती बाळू धानोरकर यांनी दिली आहे. तसेच हे राजकीय कारस्थान असल्याचाही आरोप धानोरकरांनी केला.

पाहा व्हिडीओ: