Neelam Gorhe : विधवा महिला कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी निलम गोऱ्हे यांचा पुढाकार, रायगड जिल्हा प्रशासनाला महत्वपुर्ण आदेश

| Updated on: May 26, 2022 | 9:40 AM

कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे आणि कुटुंबाची जबाबदारी महिलांवर आली आहे. अशा विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलावीत असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिले.

Neelam Gorhe : विधवा महिला कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी निलम गोऱ्हे यांचा पुढाकार, रायगड जिल्हा प्रशासनाला महत्वपुर्ण आदेश
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे
Image Credit source: tv9
Follow us on

रायगड – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी बुधवारी रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय योजनांची आढावा बैठक घेतली. या बैठकीच्यावेळी कोरोना (Corona)काळात विधवा झालेल्या महिला आणि कुटुंबांच्या पुवसनासाठी त्यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला महत्वपुर्ण निर्देश दिले आहेत. देशात शिरकाव केलेल्या कोरोनाने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. दोन वर्षाच्या काळात अनेक लोकांचे हाल झाले आहेत. ज्या महिलांवरती कुटुंब संभाळण्याची जबाबदारी आली आले अशा महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलावीत असा थेट आदेश त्यांनी दिला आहे. तसेच शेतीच्या बाबतीत अनेक महत्त्वाच्या सुचना प्रशासनाला त्यांनी दिल्या आहेत.

महिलांना स्वयंरोजगार प्रशासनाने उपलब्ध करून द्यावा

कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे आणि कुटुंबाची जबाबदारी महिलांवर आली आहे. अशा विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलावीत असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिले. अशा महिलांना स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच महिला शेतकऱ्यांना तीन एकरापर्यंत लागवडीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे अशा सूचना देखील त्यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. त्या अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय योजनांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होत्या.

450 महिलांवर पतीच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी

कोरोना संसर्ग भारतात सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सुद्धा हादरून गेली होती. अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती. त्यावेळी अनेकांचा जीव गेला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे 16 बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले, 602 मुलांनी एक पालक गमावला आहे, तर 450 महिलांवर पतीच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी आली आहे. अशा महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सुचना केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

शेतकरी महिलांना शेतीसाठी सहाय्य करावे, 3 एकरपर्यंत लागवडीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.