Engineering Students : उरी सिनेमातलं ते पक्षासारखं दिसणारं ड्रोन आठवतंय ? सेम टू सेम तसंच ड्रोन बनवलंय या विद्यार्थ्यांनी

या ड्रोनचा व्हिडिओ गोव्यात व्हायरल झाले आहेत. या ड्रोनचं सादरीकरण पणजी येथे सुरु असलेल्या विज्ञान चित्रपट महोत्सवात करण्यात आले. हे दोन जुळे भाऊ SREIT अभियांत्रिकी महाविद्यालय, शिरोडा येथे शिक्षण घेतायत. ड्रोन, व्हायरल, गोवा, उरी, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी

Engineering Students : उरी सिनेमातलं ते पक्षासारखं दिसणारं ड्रोन आठवतंय ? सेम टू सेम तसंच ड्रोन बनवलंय या विद्यार्थ्यांनी
जुळ्या भावांनी बनवलेल्या या ड्रोनचा व्हिडिओ गोव्यात व्हायरल
Image Credit source: TV9 marathi
रचना भोंडवे

|

Apr 28, 2022 | 7:25 PM

गोवा : दिप्तेश आणि दिपेश च्यारी या द्वितीय वर्षाच्या इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी (Electronics Engineering) विद्यार्थ्यांनी उरी फेम पक्षासारखा दिसणाऱ्या ड्रोनची (Drone) रचना केली आहे. या जुळ्या भावांनी बनवलेल्या या ड्रोनचा व्हिडिओ गोव्यात व्हायरल झाले आहेत. या ड्रोनचं सादरीकरण पणजी येथे सुरु असलेल्या विज्ञान चित्रपट महोत्सवात करण्यात आले. हे दोन जुळे (Twins) भाऊ SREIT अभियांत्रिकी महाविद्यालय, शिरोडा येथे शिक्षण घेतायत.

“या प्रकल्पासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. आम्ही ऑक्टोबर 2021 पासून ड्रोनचे काम करत आहोत. आम्ही आधी 3 महीने यावर गुगल आणि इतर माध्यमातून संशोधन केले आणि मग मूळ कमाला सुरुवात केली. आम्हाला यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र आम्ही हातात घेतलेले काम पूर्णत्वास नेले,” दीपेश म्हणाला.

हे सुद्धा वाचा

उरी या बॉलिवूड चित्रपटात देखील असेच ड्रोन असल्याचे आम्हाला हा सिनेमा बघितल्या नंतर समजले. आम्ही तयार केलेला ड्रोन पाळत ठेवण्यासाठी किंवा विमानाच्या मार्गाने उडणाऱ्या पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी एअरलाइन्सद्वारे वापरला जाऊ शकतो.”असा विश्वास च्यारी बंधूनी व्यक्त केला आहे. हा ड्रोन बनवण्यासाठी 10 हजार रुपये खर्च आला असून स्थानिक आमदार, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी त्यासाठी आर्थिक मदत करून च्यारी बंधूना प्रोत्साहन दिलंय. देवेंद्र वालावलकर,गोवा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें