सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांमुळे रायगडमध्ये नाराजी नाट्य; सुनील तटकरेंची टीका

| Updated on: Feb 18, 2022 | 4:54 PM

शिवसेनेच्या नेत्याविषयी बोलताना त्यांनी निधीचाही प्रश्न उपस्थि करुन निधी वाटपाच्या नाराजीवर बोलताना रायगडमध्ये जिल्हा नियोजनचा सर्वात जास्त निधी हा शिवसेनेच्याच वाट्याला आल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांमुळे रायगडमध्ये नाराजी नाट्य; सुनील तटकरेंची टीका
Follow us on

रायगडः राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांवर नाव न घेता टीका केली आहे. रायगडमधील (Raigad) तिन्ही आमदारांसोबत आमचे सौहार्दाचे संबध असताना यामागे सरकारमधील (Government of Maharashtra) कोणीतरी मंत्री (Minister) हे उद्योग करत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. महेंद्र दळवी यांनी सांगितले की, ज्या तक्रारी आहेत त्या वरिष्ठा पर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, पण तरीही जिल्हा परिषदेमधील निधीचे योग्य प्रमाणात वाटप होत नाही. हा निधी राजकीयदृष्ट्या हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महेंद्र दळवी यांनी गुरुवारी केला होता. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी आज मत व्यक्त केले,

रायगडमधील महाविकास आघाडीतल्या नाराजी विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी ही पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या तिनही आमदारांसोबत राष्ट्रवादीचे सौहार्दाचे संबंध आहेत पण कालचे वक्तव्य त्यांनी का केले हे अजूनही मला कळले नाही. यामागे सरकारमधील वरिष्ठ नेता काही उद्योग करतोय का अशी शंका मला आहे. त्यामुळे असे उद्योग करण्यापेक्षा सध्या महाविकास आघाडी समोर भाजपने मोठी आव्हानं निर्माण केली आहेत, ती पेलण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचं असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकाही केली.

शिवसेनेच्या वाट्याला जास्त निधी

शिवसेनेच्या नेत्यांबद्दल बोलताना त्यांनी रायगडमधील पालकमंत्री बदलण्याच्या मागणीनंतर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या नेत्याविषयी बोलताना त्यांनी निधीचाही प्रश्न उपस्थि करुन निधी वाटपाच्या नाराजीवर बोलताना रायगडमध्ये जिल्हा नियोजनचा सर्वात जास्त निधी हा शिवसेनेच्याच वाट्याला आल्याचे त्यांनी सांगितले. या राजकीय गोंधळामुळे गेल्या काही दिवसांपासून जनतेची कामांकडे आणि परिसरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे या गोष्टीकडेही त्यांनी लक्ष वेधून घेतले.

जिल्हा परिषदेचा निधी हायजॅक

रायगड जिल्हा परिषदेच्या निधीविषयी गुरुवारी महेंद्र दळवी यांनी टीका करताना सांगितले होते की, जिल्हा परिषदेचा हा निधी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकारणातील काही नाराजीचे सूर होते ते आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातले होते आणि त्यावर वरिष्ठांनीही यावर शांत राहण्याचा सल्ला दिला होता. या नाराजीचा सूर पकडूनच सुनील तटकरे यांनी सरकारमधील मंत्र्यावर टीका केली असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

सरकार लुटारूंच्या पाठिमागे उभा, कारखानदार, साखर आयुक्त ताटाखालचे मांजर-राजू शेट्टी

सोमय्यांना जमीन प्रकरणात एवढा इंटरेस्ट का?, रश्मीताई त्यांना माळ्याची तरी नोकरी द्या; अक्षता नाईकांचा टोला

भुजबळांनी सांगितला नाशिकच्या विकासाचा प्लॅन, म्हणाले आरोग्य जपत…