AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमय्यांना जमीन प्रकरणात एवढा इंटरेस्ट का?, रश्मीताई त्यांना माळ्याची तरी नोकरी द्या; अक्षता नाईकांचा टोला

अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणावरून (Anvay Naik suicide case) पुन्हा एकदा अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक (Akshata Naik) यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर हाच सर्वात पुढे होता, तोच सगळीकडे धावत होता. रश्मीताईंना माझी विनंती आहे की, तो आताही जमीनीच्या प्रकरणात एवढा इंटरेस्ट घेत आहे, त्याला एखाद्या माळ्याचे काम तरी मिळून द्या, असे त्यांनी म्हटले आहे.

सोमय्यांना जमीन प्रकरणात एवढा इंटरेस्ट का?, रश्मीताई त्यांना माळ्याची तरी नोकरी द्या; अक्षता नाईकांचा टोला
अक्षता नाईक, अज्ञा नाईक
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 4:34 PM
Share

मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणावरून (Anvay Naik suicide case) पुन्हा एकदा अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक (Akshata Naik) यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर हाच सर्वात पुढे होता, तोच सगळीकडे धावत होता. रश्मीताईंना माझी विनंती आहे की, तो आताही जमीनीच्या प्रकरणात एवढा इंटरेस्ट घेत आहे, त्याला एखाद्या माळ्याचे काम तरी मिळून द्या. माझ्या वडिलांनी लावलेली झाडे आहेत, ती आता सुकत आहेत.  किरीट सोमय्या यांना माळ्याचे काम दिले तर ते त्या झाडांची तरी देखरेख करतील. माळ्याची नाही जमली तर कमीत कमी त्यांना वॉचमनची तरी नोकरी द्यावी असा टोला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सोमय्यांना लगावला आहे. तसेच सोमय्या यांनी जमीन व्यवहारावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जे आरोप केले आहेत, त्या आरोपांना देखील अक्षता नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या अक्षता नाईक

यावेळी बोलताना अक्षता नाईक म्हणाल्या की, त्याने म्हटले या जमीनीवर ठाकरे परिवाराचे 19 बंगले आहेत. 19 कशाला हा उद्या म्हणेल तिथे हजार बंगले होते. या जमीनीत हिऱ्याची खाण आहे. तो ज्या पद्धतीने या प्रकरणात इंटरेस्ट घेत आहे.  त्यावरून असे वाटते की याला वॉचमनची नोकरी द्यावी, निदान तो त्या जमीनीची देखरेख तरी करेल असे अक्षता नाईक यांनी म्हटले आहे. मी किरीट सोमय्या यांनाही सांगते की, तुम्हाला जर एखादी माहिती हवी असेल तर तुम्ही माहितीच्या अधिकाराचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारवर देखील निशाणा

ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या बाजूनने उभे राहिचे की? गुन्हेगाराला पाठिशी घालायचे असा सवाल करत अक्षता नाईक यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला आहे. जेव्हा माझ्या पतीने आत्महत्या केली तेव्हा कोणाचं सरकार होतं, तेव्हा नेमकं काय झालं हे सर्वाना माहिती आहे. त्यावर अधिक काही बोलण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सोमय्या  हे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते त्यांनी तातडीने थांबावे अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा देखील अक्षता नाईक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

VIDEO: मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केलीय का?, सोमय्या यांचा सवाल आणि चौकशीची मागणी

आधी जोशीबुवा भविष्य पाहायचे, आता पाटीलबुवा पाहतात, भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना टोला

VIDEO: सोमय्या कोर्लईत येताच तणाव, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने, गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.