Raj thackeray : आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा दौऱ्यांचा सपाटा, दौऱ्यांबद्दल वाचा सविस्तर

| Updated on: Dec 12, 2021 | 5:38 PM

सर्वात आधी राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. त्यासाठी ते नाशिकला रवाना झाले आहेत. उद्या सकाळी 10 वाजता नाशिक मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश होणार आहे.

Raj thackeray : आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा दौऱ्यांचा सपाटा, दौऱ्यांबद्दल वाचा सविस्तर
14 डिसेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा
Follow us on

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने चांगलीच कंबर कसलीय. त्याचसाठी राज ठाकरे दौरे आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. सध्या मुंबई, पुणे आणि नाशिककडे मनसेने जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. तर राज ठाकरे औरंगाबादचा दौराही करणार आहेत. या निवडणुकीत मनसेला चांगल्या यशाची अपेक्षा आहे, इतर राजकीय पक्षही जोमाने मैदानात उतरले आहेत.

राज ठाकरेंच्या दौऱ्यांची सविस्तर माहिती

सर्वात आधी राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. त्यासाठी ते नाशिकला रवाना झाले आहेत. उद्या सकाळी 10 वाजता नाशिक मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश होणार आहे. नाशिकच्या दौऱ्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. औरंगाबादेतही ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

औरंगाबाद आणि पुणे दौरा

मंगळवारी राज ठाकरे औरंगाबादेत सकाळी 10 वाजता मराठवाड्यातील पदाधिकारी यांच्यासौबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता सागर लॉन येथे दिलीप चितलांगे यांच्या वर्तमान पत्राचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होणार आहेत. 15 आणि 16 डिसेंबरला ते पुण्यातल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी 17 डिसेंबरला सकाळी 10 वाजता कोंढवा, पुणे येथील साईनाथ बाबर यांच्या ई लर्निंग शाळेचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. त्याचा मनसेला आगामी निवडणुकीत किती फायदा होतो? हे निवडणुकांनंतरच कळेल. महापालिका निवडणुकांसाठी भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीसही मैदानात उतरले आहेत. मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या, मात्र काही कार्यकत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचं मनसेकडून सांगण्यात आले आहे.

Nagpur Tiger | तीन पिल्लांसह वाघीण बघीतली का? चला उमरेड करांडला अभयारण्यात

मुस्लिम आरक्षणासाठी आम्ही संघर्ष करत होतो, तेव्हा एमआयएमचे दोन आमदार कुठे होते?; नसीम खान यांचा सवाल

शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढणार? बॅनरबाजीतून आमदार आशिष शेलारांची खिल्ली, नितेश राणेंचं प्रत्युत्तर