मुस्लिम आरक्षणासाठी आम्ही संघर्ष करत होतो, तेव्हा एमआयएमचे दोन आमदार कुठे होते?; नसीम खान यांचा सवाल

मुस्लिम आरक्षणासाठी आम्ही संघर्ष करत होतो, तेव्हा एमआयएमचे दोन आमदार कुठे होते?; नसीम खान यांचा सवाल
naseem khan

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता.

गिरीश गायकवाड

| Edited By: भीमराव गवळी

Dec 12, 2021 | 5:14 PM

मुंबई: मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. ओवैसी यांच्या या हल्ल्याला काँग्रेस नेते नसीम खान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी संघर्ष करत होतो. भांडत होतो. तेव्हा एमआयएमचे दोन आमदार आणि खासदार कुठे होते? असा सवालच नसमी खान यांनी केला आहे.

नसीम खान यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014मध्ये मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात 5 टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई हायकोर्टानेही मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते. परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लीम आरक्षणावर गप्प का बसले? फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही? असा सवाल खान यांनी केला आहे.

फक्त निवडणुकीतच आरक्षण आठवते का?

राज्यात मी अल्पसंख्याक मंत्री असताना मराठा समाजाबरोबरच मुस्लीम समाजालाही आघाडी सरकारने आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर भाजपा सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. पाच वर्ष काँग्रेस पक्ष मुस्लीम आरक्षणासाठी फडणवीस सरकारशी संघर्ष करत होता. त्यावेळी एमआयएमने या आरक्षणाबद्दल तोंडातून एक शब्द काढला नाही. उलट एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी मुस्लिमांना आरक्षण न देणाऱ्या फडणवीस सरकारची सातत्याने मदतच केली. निवडणूक आल्यावरच एमआयएमला मुस्लीम आरक्षण आठवते, निवडणुक संपली की यांना आरक्षण आठवत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

एमआयएम भाजपची बी टीम

भाजपा व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे हे लोकांना माहीत आहे. मनपा आणि इतर ठिकाणच्या निवडणुकांना डोळ्यावर ठेवत ही सभा घेतली. आता सगळीकडे फिरून महाराष्ट्र आले आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

मुस्लिमांसाठी काय केले? हिशोब द्या

मुस्लीम समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा देणाऱ्या परंतु समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करुन सत्तेचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एमआयएम साथ देत असते. एमआयएमला राज्यातील मुस्लीम समाज थारा देत नाही. एमआयएमची भूमिका ही नेहमीच भाजपाला अनुकुल राहिली आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, येथे येऊन ओवैसींनी मुस्लीम समाजाला भडकावण्याचे प्रयत्न करुन नयेत. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबध्द आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्यभरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर ओवेसींना मुस्लीमांचा विकास आणि आरक्षण आठवले. आरक्षणावरून आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांनी व त्याच्या एमआयएम पक्षाने मुस्लीम समाजासाठी काय केले? या हिशोब द्यावा असा सवाल करून महाराष्ट्रातील मुस्लीम समाज सुज्ञ असून एमआयएमला पुरता ओळखून आहे त्यांना थारा देणार नाही, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी कायदे मोडत नाहीत

काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबईत आल्यावर जमाव बंदी लागू करणार का? असा सवाल ओवैसी यांनी केला होता. त्यावरही खान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहूल गांधी कायदा मोडणार नाहीत. त्यांना कायदा माहीत आहे. ओवैसी बॅरिस्टर आहेत त्यांनी कायदा मोडला. राजस्थानमध्ये आज राहुल गांधींची रॅली होती. त्याला तुफान जनसागर लोटला होता. काँग्रेसकडे जनादेश येत आहे, याचचं हे लक्षण आहे, असंही ते म्हणाले.

काँग्रेसशिवाय आघाडी अशक्य

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाचं नेतृत्व करावं असं राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहेत. त्याबाबत विचारले असता, शरद पवार देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला आपल्या नेत्याने नेतृत्व करावे असे वाटते. यात काही गैर नाही, असं सांगतानाच काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी होऊच शकत नाही, हे अटळ सत्य आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

अजितदादांची अजब अट! राष्ट्रवादीलाच निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो, लातूरमधील औसा इथले शब्द!

Kashi Vishwanath Corridor: मुमताज अलीने खास तयार केलेले अंगवस्त्र देऊन मोदींचा सत्कार होणार; पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी

Sharad Pawar Birthday : महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच 2024मध्ये दिल्लीत होईल; छगन भुजबळांचं मोठं विधान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें