अजितदादांची अजब अट! राष्ट्रवादीलाच निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो, लातूरमधील औसा इथले शब्द!

लातूरमधील औसा नगरपालिकेच्या विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी औसा येथील लोकांना थेट अट घातली. तुम्ही राष्ट्रवादीला निवडून आणलं तर तुम्हाला 100 कोटी रुपयांचा निधी देईल, असं ते म्हणाले. अजितदादांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

अजितदादांची अजब अट! राष्ट्रवादीलाच निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो, लातूरमधील औसा इथले शब्द!
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 4:21 PM

लातूर (औसा): उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी लातूर जिल्ह्यातल्या औसा नगर पालिकेत केलेलं वक्तव्य चांगलंच गाजतंय. औसा (Ausa, Latur) येथील नगरपालिकेच्या विकासकामाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, नगरपालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. मात्र एक अट आहे. तुम्ही जर औसा नगर पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला निवडून दिले तरच हा निधी तुमच्याकडे येईल.’ अजित पवारांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं गैर आहे, असं मत जनसामान्यांमध्ये उमटत आहे.

..तरच 100 कोटी देतो, हा माझा शब्द!

औसा नगर पालिकेत राष्ट्रवादीच्याच पॅनलला म्हणजे डॉ. अफसर शेख यांच्या पॅनलला निवडून दिले तरच मी तुम्हाला 100 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देतो, हा माझा शब्द आहे, असं अजित पवार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. आता 100 कोटी रुपयांच्या निधी देण्याच्या अजित पवारांच्या शब्दाकडे औसा येथील जनता कशी पाहते, हे पहावे लागेल.

विकासकामाचे उद्घाटन प्रसंगी वक्तव्य

औसा येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही लोक उघड्यावर शौचास बसतात, ही लाजिरवाणी बाब आहे. स्वच्छता अभियानात एकदाच पारितोषिक मिळवून चालणार नाही, तर त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी जनतेनेही आपली जबाबदारी पार पाडावी.

इतर बातम्या-

Sharad Pawar | सहकुटुंब, सहपरिवार…भावुक झालेल्या पवारांनी सांगितलं 12 डिसेंबरचं मायाळू नातं…!

VIDEO: तेरे संग यारा… टांझानियाच्या तरुणाचे आणखी एक गाणे हीट! लाजवाब लिपसिंक, नेटकरी म्हणाले awesome!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.