VIDEO: तेरे संग यारा… टांझानियाच्या तरुणाचे आणखी एक गाणे हीट! लाजवाब लिपसिंक, नेटकरी म्हणाले awesome!

एका आफ्रिकी तरुणाने अक्षय कुमारच्या 'रुस्तम' चित्रपटातील गाण्यावर फिदा होऊन सोशल मिडियावर त्यातील गाण्याचे लिपसिंक शेअर केले आहे. तरुणाचे हावभाव आणि अक्षय कुमारचे हिट गाणे यामुळे सोशल मीडियावर सध्या धमाल उडवून दिलीय. असंख्य लोकांना व्हिडिओ आवडतोय आणि तो वेगाने तो शेअर केला जातोय.

VIDEO: तेरे संग यारा... टांझानियाच्या तरुणाचे आणखी एक गाणे हीट! लाजवाब लिपसिंक, नेटकरी म्हणाले awesome!
टांझानियातील भावंडांनी सध्या बॉलीवूडच्या गाण्यावर लिपसिंक करत धमाल उडवली आहे.
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 3:50 PM

टांझानियातले भाऊ-बहीण सध्या बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून इंटरनेट सेंसेशन बनले आहेत. याच मालिकेत आणखी भर घालत भावाने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘रुस्तम’ (Rustum) या चित्रपटातील तेरे संग यारा.. (Tere sang Yara) गाण्यावर लिपसिंक करून सोशल मीडियावर (Social media) धमाल उडवली आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ असंख्य लोकांनी पसंत केलाय. या भावंडांच्या जोडीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या ‘शेरशाह’ गाण्यातील ‘राता लंबिया’ गाण्यावर लिपसिंक केले होते. त्यानंतर इंटरनेटवर त्यांच्या चाहत्यांची लाटच उसळली आहे.

कोण आहे हा तरुण?

किली पॉल आणि नीमा नावाचे हे आफ्रिकी भाऊ-बहीण आहेत. सोशल मीडियाचे यूझर्स सध्या त्यांच्या तुफ्फान प्रेमात पडलेत. kili_paul नावाने त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्यावर ते बॉलिवूड चित्रपटातील गाण्यांवर लिपसिंक आणि डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर करत असता. नुकतेच त्यातील भावाचे एक गाणे खूप व्हायरल होत आहे. अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ चित्रपटातील ‘तेरे संग यारा..’ वर लिपसिंक करत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला. चला पाहुयात…

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

या आफ्रिकी भावंडांची लोकप्रियता एवढ्या वेगाने वाढत आहे की, व्हिडिओ शेअर केल्यानंतर केवळ 13 तासातच 31 हजारपेक्षा जास्त यूझर्सनी त्याला लाइक केले. किली आणि नीमा बॉलीवूडच्या गाण्यांवर लिपसिंक करत भारतात लोकप्रिय होत आहेत. भारतीय सोशल मीडिया यूझर्स या जोडीच्या प्रेमात पडले आहेत. नवा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

एका यूझरने कमेंटमध्ये लिहिले, ‘तुम्ही खूप छान काम करत आहात. मला खरोखरच तुमचे व्हिडिओ पहायला आवडतात’. एका महिला यूझरने लिहिले, ‘व्हिडिओच्या शेवटी तुमचे हसणे… हाए…’ एकाने प्रश्न विचारलाय, तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी खूपच छान आहे. कोणता स्मार्टफोन वापरता?

यापूर्वी या भावंडांनी अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफच्या ‘टिप टिप बरसा पानी’ वर डान्स आणि लिपसिंक केले होते. त्या गाण्यातील जबरदस्त डान्स मूव्ह कॅटरीनाने पाहिल्या असत्या तर तिनेही यांचे खूप कौतुक केले असते.

इतर बातम्या-

बिन लग्नाचं राहू नका, जे राहिले त्यांनी देश वेठीस धरला; ओवेसींचा जोरदार हल्ला

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नेहरू सेंटरच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं दाटलेल्या आवाजातल भाषण …

'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे
'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे.
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री.
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?.
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?.
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले.
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.