Sharad Pawar Birthday : महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच 2024मध्ये दिल्लीत होईल; छगन भुजबळांचं मोठं विधान

Sharad Pawar Birthday : महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच 2024मध्ये दिल्लीत होईल; छगन भुजबळांचं मोठं विधान
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचा आढावा

एककीडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन दिल्लीतील आपली स्पेस तयार करण्याचं काम सुरू केल आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 12, 2021 | 4:31 PM

मुंबई: एककीडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन दिल्लीतील आपली स्पेस तयार करण्याचं काम सुरू केल आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सूचक विधान करून राजकीय चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला. तोच चमत्कार 2024मध्ये दिल्लीत होईल, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुंबईत व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला संबोधित करताना छगन भुजबळ यांनी हे विधान करून राजकीय चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे. संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार 2024मध्ये दिल्लीत होईल. त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन भुजबळांनी केले.

पवारांचं योगदान अतुलनीय

यावेळी भुजबळांनी पवारांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील कार्याचा धावता आढावा घेतला. देशात साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यासह विविध महत्वाच्या क्षेत्रात पवारांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेलं काम जगभरात गाजलं असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम त्यांनी केलं. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे आज देश अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे आज जगभरात अन्न,धान्याची फळांची निर्यात आपण करू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

पवारांनीच ओबीसींना आरक्षण दिलं

आजवर अनेक संकटांना पवारांनी तोंड दिले आहे. किती जरी मोठ संकट त्यांच्यासमोर आलं तरीदेखील पवारांचा संयम कधीही ढळणार नाही ही अतिशय विशेष बाब आहे. आज देशभरात जो ओबीसींचा प्रश्न गाजत आहे. त्या ओबीसी समाजाला सर्व प्रथम महाराष्ट्रात आरक्षण देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. राज्यात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासोबत अनेक क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतली. त्यामुळे महाराष्ट्र एका उंचीवर पोहचला, असं ते म्हणाले.

त्यांचाच आरक्षणाला विरोध

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपले अहोरात्र प्रयत्न सुरु आहे. मात्र एकीकडे ज्यांनी सरकारमध्ये असतांना ओबीसींसाठी अध्यादेश काढला. त्याच पक्षाचे पदाधिकारी कोर्टात या आरक्षणाला आवाहन देत आहे. यावरून विरोधकांची कथनी एक आणि करणी एक असून मुंह में राम और बगल छुरी अशी भूमिका आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्यांना खड्यासारखे बाजूला करा

आज ओबीसी आरक्षणाला विरोध होत आहे. उद्या देशातील इतर आरक्षणाला देखील विरोध होईल. आरक्षण काढून टाकण्याचा छुपा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न उधळून लावण्याची सर्व ओबीसीसह इतर नागरिकांची जबाबदारी आहे. तुमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्याना येणाऱ्या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला ठेऊन त्यांना आपल्या दारात उभं करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित बातम्या:

तर गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं: छगन भुजबळ

राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल

Sharad Pawar Birthday : ‘शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें