राणेंच्या वक्तव्याचे सिंधुदुर्गातही पडसाद, शिवसैनिकांविरोधात राणे समर्थक आक्रमक

| Updated on: Aug 24, 2021 | 2:38 PM

तसेच नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेस रोखण्याचा प्रयत्न झाल्यास राणे समर्थक जशास तसं उत्तर देणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय. राणे साहेब राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत.

राणेंच्या वक्तव्याचे सिंधुदुर्गातही पडसाद, शिवसैनिकांविरोधात राणे समर्थक आक्रमक
Follow us on

सिंधुदुर्ग – नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद सिंधुदुर्गातही उमटायला लागलेत. जिल्ह्यात शिवसैनिकांच्या निदर्शनानंतर कुडाळमधील राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यामुळे सिंधुदुर्गात वातावरण तापल्याची चिन्हे आहेत. भाजप कार्यालयाच्या बाहेर भाजप कार्यकर्ते एकवटले असून, नारायण राणेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

तर राणे समर्थक जशास तसं उत्तर देणार

तसेच नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेस रोखण्याचा प्रयत्न झाल्यास राणे समर्थक जशास तसं उत्तर देणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय. राणे साहेब राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. त्यांच्याविरोधात किती गुन्हे दाखल केलेत तरी त्यास उत्तर देण्यास समर्थ आहोत. कार्यकर्त्यांना त्याची फिकीर करण्याची गरज नाही. मात्र जनआशीर्वाद यात्रेस रोखण्याचा प्रयत्न झाल्यास सिंधुदुर्गातील कार्यकर्ते जशास तसे उत्तर देणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

आज राणे काय म्हणाले?

दरम्यान, नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांचे वकील अॅड. संजय चिठणील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?, असा सवाल राणे यांनी केला. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहीत नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी मान्य करणार नाही. तुम्ही माहिती घ्या, असं सांगतानाच मी जे काही बोललो तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, असंही ते म्हणाले.

राणे काय म्हणाले होते?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या

सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं ओपन चॅलेंज

राणे म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान, आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणतात, ते कोर्टात सांगा!

शिवसेना-भाजपच्या राड्यात, राष्ट्रवादीची उडी; नवाब मलिक म्हणाले, हा तर महाराष्ट्राचाच अपमान

Rane’s statement reverberates in Sindhudurg too, Rane supporters attack Shiv Sainiks