AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-भाजपच्या राड्यात, राष्ट्रवादीची उडी; नवाब मलिक म्हणाले, हा तर महाराष्ट्राचाच अपमान

मुंबई, चिपळूणसह राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये ठिकठिकाणी राडे सुरू आहेत. या राड्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. (nawab malik)

शिवसेना-भाजपच्या राड्यात, राष्ट्रवादीची उडी; नवाब मलिक म्हणाले, हा तर महाराष्ट्राचाच अपमान
nawab malik
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 12:14 PM
Share

मुंबई: मुंबई, चिपळूणसह राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये ठिकठिकाणी राडे सुरू आहेत. या राड्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. भाजप नेते नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही, असे सांगतानाच कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. (it’s not only cm uddhav thackeray insult, it’s insult of maharashtra, says nawab malik)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यानंतर नवाब मलिक यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले त्याचपध्दतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे मात्र महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही, असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी दिला आहे. राणे यांनी जी भाषा वापरली आहे ती अशोभनीय आहे. ही भाषा व हे राजकारण महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही हे भाजपला कळले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आज राणे काय म्हणाले?

दरम्यान, नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांचे वकील अॅड. संजय चिठणील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?, असा सवाल राणे यांनी केला. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहीत नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी मान्य करणार नाही. तुम्ही माहिती घ्या, असं सांगतानाच मी जे काही बोललो तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, असंही ते म्हणाले.

राणे काय म्हणाले होते?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. (it’s not only cm uddhav thackeray insult, it’s insult of maharashtra, says nawab malik)

संबंधित बातम्या:

“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा संताप, दादरमध्ये डिवचणारे पोस्टर

Narayan Rane : नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यलय फोडलं, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक

नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, भाजपने ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं

(it’s not only cm uddhav thackeray insult, it’s insult of maharashtra, says nawab malik)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.