नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, भाजपने ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं

केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील" असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला. तर नारायण राणेंना अटक होत नाही. अटक करण्याची हिंमत नाही. सरकारने धाडस दाखवावं, असं ओपन चॅलेंजच भाजप नेते प्रमोद जठारांनी दिलं.

नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, भाजपने ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं
चंद्रकांत पाटील, नारायण राणे, प्रमोद जठार
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 9:33 AM

पुणे : “भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही दाखवली? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. तर, नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, असं म्हणत भाजप नेते प्रमोद जठार (Pramod Jathar) यांनी ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला.

“प्रत्येकाची स्टाईल असते, त्यात व्यक्तिगत असूया नसते. पण अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. मी त्याचं समर्थन करत नाही. कोकणात शिव्यांशिवाय बोलणंच पूर्ण होत नाही. ते असूयेपोटी नसतं, रागापोटी नसतं” असा दावा पाटलांनी केला.

“राणे ‘मारतो’ म्हणाले नाहीत, ‘मारणार आहे’ ही धमकी असते, न्यायालयात ही गोष्ट टिकणारच नाही. राणे तसे म्हणालेच नाहीत. ‘मी असतो तर’ असं ते म्हणाल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“उद्धवजींनी दसऱ्याला केलेलं भाषण बघा”

स्वत: उद्धवजींनी दसऱ्याला केलेलं भाषण बघा, राजकारणात भाषा सांभाळून वापरावी हे खरं आहे. त्यामुळे अशा एखाद्या वक्तव्यावरुन टोक गाठणं चुकीचं आहे. उद्धवजींची भाषणं काढा, असं चॅलेंजच चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

“शब्द जपून वापरलं पाहिजे हे खरंय”

नाशिक पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश म्हणजे हास्यास्पद आहे. मला वाटतं आणखी काही घडणार असेल तर ते डायवर्ट करण्याचा प्रयत्न आहे. केवळ उद्धवजींचा भाषणाचा उल्लेख हे वैयक्तिक आहे. शब्द जपून वापरलं पाहिजे हे खरंय, मग हे सगळ्यांनाच लागू आहे, असंही चंद्रकांतदादा म्हणाले.

“राणेंना अटक होईल असं वाटत नाही”

जन आशिर्वाद यात्रा निघणार. न्यायालयात हे दोन सेकंदात उडणार. हे सगळं भीतीपोटी झालं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राणे साहेब जात आहेत. कोकणात शिवसेनेचं वर्चस्वाला हादरा बसत आहे. नारायण राणेंना अटक होईल असं वाटत नाही. न्यायालय योग्य निर्णय देईल. यात्रा सुरु राहील. दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले तर ही जबाबदारी प्रशासनाची. एखाद्या वाक्यावरुन टोक गाठायचं असेल तर शासनाच्या मनात असंतोष निर्माण करण्याचं आहे हे दिसतंय.

पाहा व्हिडीओ :

मुख्यमंत्र्यांनी ठाकरे भाषेत उत्तर द्यावं – प्रमोद जठार

दरम्यान, नारायण राणे यांचा दौरा होणार आहे, थोड्याच वेळात ते निघतील. दौरा योग्य प्रकारे 27 तारखेला सिंधुदुर्गात समाप्त होईल, अशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली. राहिला प्रश्न मीडियातील बातम्यांचा. सरकार सूडबुद्धीने काम करत आहे. कालच्या दौऱ्यात आम्ही हॉल किंवा जागा निश्चित करत होतो, त्या जागाही मिळत नव्हत्या. राणेसाहेबांचा आज आणि उद्या रत्नागिरीची दौरा असताना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची मुद्दाम बैठक लावली. ते राणे साहेबांच्या बैठकीला जाऊ नयेत म्हणून. नारायण राणे जे बोलले ते ठाकरी भाषेत बोलले. या ठाकरी भाषेवर गुन्हा दाखल करायचे असतील तर प्रत्येक दसरा मेळाव्यातील भाषणावर गुन्हा दाखल करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे भाषेत उत्तर द्यावं, असं आव्हान प्रमोद जठारांनी दिलं.

“आर आर पाटलांची कोपरापासून ढोपरापर्यंतची भाषा”

स्वातंत्र्य दिन कधी आहे हे मुख्यमंत्र्यांनी विचारणं म्हणजे अपमान आहे. त्याला राणेंनी ठाकरी भाषेत उत्तर दिलं. आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत उत्तर द्यावं. मुख्यमंत्र्यांनी देशाचा अपमान केला, त्याला राणेंनी उत्तर दिलं. ठाकरी भाषेत उत्तर द्या. दसरा मेळाव्यात अशी वक्तव्य केली होती. आर आर पाटलांनी कोपरापासून ढोपरापर्यंतची भाषा केली होती. त्यामुळे उत्तर द्यायचं असेल तर ठाकरे भाषेत द्या, असंही जठार म्हणाले.

राणेसाहेब किंवा भाजपला शिवसेना किंवा सरकार रोखू शकत नाही. जन आशिर्वाद यात्रा संपूर्ण हिंदुस्थानात फिरत आहे. राणेसाहेब 70 पेक्षा जास्त वयाचे असताना पूरग्रस्तांपर्यंत पोहोचत आहेत. राणेसाहेबांना घाबरत आहेत. राणे साहेबांना अटक झाली तर भाजपचे सर्व कार्यकर्ते अटक करुन घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही प्रमोद जठार यांनी दिला. राणेंना अटक होत नाही. अटक करण्याची हिंमत नाही. सरकारने धाडस दाखवावं, असं ओपन चॅलेंजच जठारांनी दिलं.

पाहा व्हिडीओ :

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, नारायण राणेंना अटक करा, नाशिक पोलीस आयुक्तांचे निर्देश

“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा संताप, दादरमध्ये डिवचणारे पोस्टर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.