‘त्या’ रुग्णांचे साडे सतरा लाख रुपये परत करा; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

| Updated on: May 25, 2021 | 3:24 PM

जालन्यात अनेक रुग्णांनी कोरोनाबाधितांकडून अधिकचे बिल वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Refund excess charges taken from Covid positive patients in 7 days: ravindra binwade)

त्या रुग्णांचे साडे सतरा लाख रुपये परत करा; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे आदेश
ravindra binwade
Follow us on

जालना: जालन्यात अनेक रुग्णांनी कोरोनाबाधितांकडून अधिकचे बिल वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही रक्कम 15 लाख 52 हजार रुपये एवढी आहे. त्याची जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गंभीर दखल घेतली असून ही रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. (Refund excess charges taken from Covid positive patients in 7 days: ravindra binwade)

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी 12 खासगी दवाखानांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, स्थानिक निधी लेखा परीक्षाचे सहाय्यक संचालक चंद्रकांत पाटील, सहाय्यक कोषागार अधिकारी दीपक जयवळ यांच्यासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयेही रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. खासगी रुग्णालयांना कोव्हिड बाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच देयक आकारण्याचे बंधनकारक केले आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत देयके तपासण्यासाठी परीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 12 दवाखान्यांनी शासन नियमापेक्षा 291 रुग्णांकडून एकूण 17 लाख 52 हजार 327 रुपये अधिक घेतल्याचं उघड झालं. त्यामुळे जिल्हाधिकारी बिनवडे यांनी नियम डावलून घेण्यात आलेली ही रक्कम रुग्णांना येत्या सात दिवसांमध्ये परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

तरच बिल द्या

जिल्हा प्रशासनामार्फत खासगी रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन तसेच आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे स्वत: प्रयत्न करत आहेत. खासगी रुग्णालयांनी सुद्धा कोरोनाच्या काळात रुग्णांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा देत शासन नियमानुसारच बिल आकारावे. काही रुग्णालये रुग्णांना पक्के बिल देण्याऐवजी कच्चे बिल देऊन अधिकची रक्कम उकळत आहेत. तशा तक्रारीच रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयात देयकांची तपासणी करण्यासाठी परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णाला उपचारानंतर सुट्टी देताना परीक्षकांच्या तपासणीनंतरच रुग्णांकडून बिल स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नातेवाईकांना कोव्हिड वॉर्डात प्रवेश नकोच

अनेकवेळा कोव्हिड बाधित रुग्णांवर उपचार करत असताना त्यांच्या नातेवाईकांना कोव्हिड वॉर्डात प्रवेश देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नातेवाईकांना कोरोना वॉर्डमध्ये प्रवेश दिल्याने कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना कोव्हिड वॉर्डमध्ये प्रवेश देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

12 रुग्णालये पैसे परत करणार

यावेळी प्रत्येक रुग्णालयाने कोव्हिड बाधितांवर उपचारापोटी अधिकचे देयक न स्वीकारण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. निरामय हॉस्पिटल, जालना क्रिटीकल केअर, सांगळे हॉस्पिटल, ओजस हॉस्पिटल, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, संतकृपा हॉस्पिटल, अंबेकर हॉस्पिटल, जालना हॉस्पिटल, सेवाभारती कोव्हिड हॉस्पिटल, व्यंकटेश्वर हॉस्पिटल, शिंदे बाल रुग्णालय, जालना तर अंबड येथील सह्याद्री हॉस्पिटल या 12 रुग्णांलयांनी शासन दरापेक्षा अधिकचे आकारण्यात आलेले 17 लाख 52 हजार 327 रुपये 291 रुग्णांना परत करण्याचे मान्य केले. (Refund excess charges taken from Covid positive patients in 7 days: ravindra binwade)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती

एलोपॅथीवर टिप्पणी करणारे रामदेव बाबाही होते रुग्णालयात दाखल!, आचार्य बालकृष्ण यांनीही घेतले एलोपॅथी उपचार!

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने आतापर्यंत 20 जणांचा बळी

(Refund excess charges taken from Covid positive patients in 7 days: ravindra binwade)