सचिन वाझे घाणेरड्या राजकारणाचे बळी; अटकेमुळे कोल्हापुरातील मित्रपरिवाला धक्का

| Updated on: Mar 15, 2021 | 3:14 PM

चांगलं काम करून ही वारंवार वादग्रस्त ठरत असल्याबद्दलची खंत सचिन वाझे अनेकदा व्यक्त करायचे | Sachin Vaze NIA

सचिन वाझे घाणेरड्या राजकारणाचे बळी; अटकेमुळे कोल्हापुरातील मित्रपरिवाला धक्का
25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचले. तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा प्रश्न सचिन वाझे यांना विचारला. त्यावेळी सचिन वाझे सँडविच खात उभे होते.
Follow us on

कोल्हापूर: अंबानी स्फोटक प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या कोल्हापुरातील मित्र परिवाराला धक्का बसला आहे. सचिन वाझे हे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी आहेत त्यांच्याकडून अशी चूक होणे शक्य नाही, असे मत वाजे यांचे कोल्हापुरातील मित्र रहीम खान यांनी व्यक्त केले. वाझे हे घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरत असल्याची शंका देखील त्यांनी उपस्थित केली. (Sachin Vaze investigation by NIA)

चांगलं काम करून ही वारंवार वादग्रस्त ठरत असल्याबद्दलची खंत सचिन वाझे अनेकदा व्यक्त करायचे, असेही त्यांनी सांगितले. रहीम खान हे सचिन वाझे यांचे महाविद्यालय मित्र तसेच क्रिकेट टीममधील सहकारी आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यानंतर रविवारी सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सचिन वाझे यांची 10 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची कसून चौकशी सुरु आहे.

सचिन वाझेंची प्रकृती पुन्हा खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवले

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोठडीत असलेले API सचिन वाझे (Sachin Vaze) यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना आता उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. काल रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे एनआयएच्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. साधारण एक वाजण्याच्या सुमारास हे डॉक्टर एनआयएच्या कार्यालयातून बाहेर पडले. (Sachin Vaze sachin waze facing health problems)

त्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा वाझे यांची प्रकृती खालावल्याचे समजते. एनआयएच्या कार्यालयात उपचार करणे शक्य नसल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते. यापूर्वी शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग 13 तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून NIA कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

VIDEO: वाझेंचा पाय आणखी खोलात, त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती, बघा 24 फेब्रुवारीला इनोव्हा कुठून बाहेर पडतेय?

स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद

(Sachin Vaze investigation by NIA)