भाजप-शिवसेनेचे सरकार सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करणार; सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला विश्वास

| Updated on: Aug 09, 2022 | 9:16 PM

मागील अडीच वर्षाच महाविकास आघाडी सरकारमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसली होती, राज्यातील अनेक विकासकामं या मविआमुळे खोळंबून राहिली होती, त्या कामाना आता वेग येणार असून मंत्री जोमाने कामाला लागतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप-शिवसेनेचे सरकार सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करणार; सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला विश्वास
सदाभाऊ खोत
Follow us on

सांगलीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. महाविकास आघाडीच्या सरकारमुळे गेली अडीच वर्षे राज्यातील विकासाला खीळ बसलेली होती. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे महाराष्ट्रातील विकासाला (Development) चालना मिळणार असून या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री जोमाने कामाला लागतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल व्हावा ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. ती इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मला आत्मविश्वास आहे की राज्यातील शेतकरी, शेतमजूर व बाराबलुतेदार या सगळ्यांना योग्य प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम भाजप-शिवसेनेचे सरकार करणार असल्याचा मला विश्वास आहे असंही सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सांगितले.

सर्व घटकपक्षांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी घटक पक्षांना मंत्रीपदे व आमदारकी देऊन योग्य न्याय दिला होता.

राज्यामध्ये आमचं सरकार

यावेळीसुद्धा सर्वांना बरोबर घेऊन काम करतील. त्यामुळे कोणताही घटकपक्ष नाराज होण्याचे कारण नाही आहे कारण आज राज्यामध्ये आमचं सरकार आलेलं आहे. या सत्तेच्या माध्यमातून आम्हाला जनतेचा विकास साधायचा आहे आणि आम्ही निश्चितपणे ते काम करू हा आम्हाला विश्वास आहे असं मतही यावेळी व्यक्त केले.

राज्याच्या विकासाला खीळ

मागील अडीच वर्षाच महाविकास आघाडी सरकारमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसली होती, राज्यातील अनेक विकासकामं या मविआमुळे खोळंबून राहिली होती, त्या कामाना आता वेग येणार असून मंत्री जोमाने कामाला लागतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केला.

मिळूनमिसळून काम करणारा नेता

या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मिळूनमिसळून काम करणारा नेता असल्याने आणि सर्व घटकपक्षांना बरोबर घेऊन जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्यानेच शिंदे-फडणवीस सरकार जोमाने काम करणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.