“विजय वडेट्टीवारांना काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देणार”

| Updated on: Jan 26, 2021 | 1:58 PM

हुजन कल्याण विकासमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार केला जाईल अशी घोषणा कोल्हापुरात केली आहे. (Sakal Maratha Samaj Vijay Wadettiwar)

विजय वडेट्टीवारांना काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देणार
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर
Follow us on

कोल्हापूर : बहुजन कल्याण विकासमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याचा मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार केला जाईल, अशी घोषणा सकल मराठा समाज या संघटनेने केली आहे.या घोषणेची अधिकृत माहिती सचिन तोडकर यांनी दिली दिली. तसेच, समस्त मराठा समाजाने वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळं फासण्याचे आवाहनही त्यांनी केले. सकल मराठा समाजाच्या या घोषणेनंतर वडेट्टीवार यांना अद्याप अधिकृत प्रतक्रिया दिलेली नाही. (Sakal Maratha Samaj criticizes Vijay Wadettiwar on his comment of Gaikwad commission)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू होतं.  या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये आंदोलन केले. यावेळी त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सचिन तोडकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या चेहऱ्याला जो कोणी काळ फासेल त्या व्यक्तीचा कोल्हापुरातील मराठा समाज, मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर  सत्कार करेल असं सांगितल.

मराठा समाज वडेट्टीवार यांच्याविरोधात आक्रमक का?

ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना घेऊन जालन्यात, महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चादरम्यान त्यांनी गायकवाड आयोगाचा मागासवर्गाचा अहवाल विश्वासार्ह नाही, असे वक्तव्य केले होते. वेडट्टीवार यांच्या याच विधानामुळे मराठा समाजात त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. त्यानंतर सकल मराठा समाजाने वरील घोषणा केली.

विधानसभेत स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मांडणार

विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी केली आहे. त्यासाठी ते विधानसभेत स्वतंत्र जनगणनेचा प्रस्तावसुद्धा मांडणार असल्याचं सांगितलं होतं. “आम्ही वकील दिला. जर तो दिला नसता तर ओबीसींचं आरक्षण रद्द झालं असतं. बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. महाज्योतीचं कार्यालय औरंगाबादला सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,” असं वडेट्टीवार 24 जानेवारी रोजी म्हणाले होते.

गायकवाड आयोग काय आहे?

मराठा समाजाचं आर्थिक मागसलेपण ठरवण्यासाठी राज्य सरकारने वेळोवेळी आयोगांची स्थापना केली होती. डल आयोग (साल 1990), राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोग (2000), खत्री आयोग (2001) व बापट आयोग (2008) आदी आयोगांनी मराठा समाज मागास नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर गायकवाड आयोग नेमण्यात आला. या आयोगाने उलट अहवाल देताना मराठा समाज मागास असल्याचं म्हटलं होतं. गायकवाड आयोगाने प्रथमच साद्यंत तपशील गोळा करून आणि शास्त्रशुद्ध विश्लेषण करून अहवाल दिला असल्याने तोच अचूक आहे, असा युक्तिवाद मराठा आरक्षण समर्थक अखिल भारतीय मराठा महासंघतर्फे करण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या :

तरीही काही लोक आमच्यात अतिक्रमण करतायत: विजय वडेट्टीवार

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा : विजय वडेट्टीवार

(Sakal Maratha Samaj criticizes Vijay Wadettiwar on his comment of Gaikwad commission)