गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर शाई का फेकली? संभाजी ब्रिगेडने केला खुलासा

गुणरत्न सदावर्ते हे राज्यातील विविध भागात जाऊन ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासह कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल करत आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर शाई का फेकली? संभाजी ब्रिगेडने केला खुलासा
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 26, 2022 | 3:14 PM

सोलापूर : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापूर येथील पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत राडा करत गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर काळी शाई फेकली आहे. त्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, अजित पवार यांच्यासह जोरदार टीका केली आहे. सदावर्ते हे नेहमीच विकृत पद्धतीने मांडणी करत आहे. या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे. प्रबोधनाची भूमी हा महाराष्ट्र आहे. परंतु ह्या महाराष्ट्राच्या भूमीला विध्वंस करण्याची भूमिका त्यांनी हाती घेतले आहे, भाजपचा अजेंडा ते राबवत आहे. म्हणून त्यांना विरोध सुरू असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आखरे यांनी म्हंटले आहे.

तर दुसरींकडे संभाजी ब्रिगेडच्या ज्या पदाढीकाऱ्यांनी शाईफेक केली त्यांनीही सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

महाराष्ट्राचे तुकडे करण्याची इच्छा गुणरत्न सदावर्ते यांची आहे आणि हे कदापी संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही असे म्हणत सदावर्ते यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

गुणरत्न सदावर्ते हे राज्यातील विविध भागात जाऊन ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासह कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल करत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांना विरोध देखील होत आहे. उस्मानाबाद येथेही सदावर्ते यांना विरोध झालेला होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते हे सोलापूर दौऱ्यावर होते.

पत्रकार परिषद सुरू असतांना सदावर्ते यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सदावर्ते बोलत असतांना संभाजी ब्रिगेडच्या वतिने काळी शाई फेकण्यात आली आहे.

शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात संवाद यात्रा सळो की पळो करून सोडत असल्याने त्यांची पिलावळ मला विरोध करत असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटले आहे.

Follow Us