‘त्या’ 1500 रुपयांसाठी सांगलीच्या रिक्षा चालकांची दोन महिन्यांपासून कसरत

| Updated on: Jun 08, 2021 | 9:25 AM

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले (Sangli Auto Rikshaw Drivers). त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना आर्थिक संकटात मदत करण्यासाठी प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता.

त्या 1500 रुपयांसाठी सांगलीच्या रिक्षा चालकांची दोन महिन्यांपासून कसरत
auto rikshaw
Follow us on

सांगली : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले (Sangli Auto Rikshaw Drivers). त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना आर्थिक संकटात मदत करण्यासाठी प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र, त्या 1500 रुपयांसाठी सांगलीच्या रिक्षा चालकांची गेल्या दोन महिन्यांपासून कसरत सुरु आहे (Sangli Auto Rikshaw Drivers Did Not Get The Announced Financial Assistance From Past Two Months Due To Oppressive Conditions).

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रिक्षा चालकांना 1500 रुपयांची मदत जाहीर केली होती. ही मदत जाहीर करुन आता दोन महिने झाले तरी अनेक रिक्षा चालकांना मदत मिळालेली नाही.

‘रिक्षा चालकांना सरसकट मदत मिळावी’

सांगली जिल्ह्यात 10 हजार रिक्षा चालक आहेत. त्यापैकी साडे नऊ हजार रिक्षा चालक हे परवाना धारक आहेत. पैसे मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या अनेक जाचक अटी आहेत. पण, जिल्ह्यात अनेक अल्प शिक्षित रिक्षा चालक आहेत, त्यामुळे या अटी पूर्ण करण्यात त्यांना अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक रिक्षा चालक वैतागले आहेत. त्यामुळे ऑनलाईन ऐवजी रिक्षा चालकांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी आता रिक्षा संघटना करत आहे.

रिक्षाचालकांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार

परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1 हजार 500 रुपये एवढे अर्थ सहाय्य देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक आणि आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल. परवानाधारक रिक्षा चालकांनी https://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत.

महाराष्ट्रातील 7. 15 लाख रिक्षा चालकांना फायदा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन निर्बंध लावताना समाजातील काही घटकांना मदत देण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांचा समावेश करणात आला होता. त्यानुसार आता परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1 हजार 500 रुपये अर्थ सहाय्य केलं जात आहे. राज्य सरकार 7. 15 लाख रिक्षा चालकांना 1500 रुपये देणार आहे.

Sangli Auto Rikshaw Drivers Did Not Get The Announced Financial Assistance From Past Two Months Due To Oppressive Conditions

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारनं शब्द पाळला, रिक्षा चालकांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात