CCTV VIDEO: सांगलीतील कुरळपमध्ये सोसायटी निवडणुकीत दगडफेक; पोलीस मारहाणीत ग्रामपंचायत सदस्य गंभीर

| Updated on: Apr 13, 2022 | 5:24 PM

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील राजारामबापू सहकारी सोसायटीच्या निवडणुकीनंतर दोन गटात दगडफेक झाली होती. त्यानंतर पोलीस कुमक मागवून दगडफेक झाली त्या ठिकाणाहून जाताना पोलिसांकडून एकाला मारहाण केली गेली ती घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

CCTV VIDEO: सांगलीतील कुरळपमध्ये सोसायटी निवडणुकीत दगडफेक; पोलीस मारहाणीत ग्रामपंचायत सदस्य गंभीर
सांगलीतील कुरळपमध्ये मिरवणुकीवेळी झालेल्या दगडफेकीत पोलीस जखमी
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली:  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कुरळप (Sangli Kurlap)  येथील राजारामबापू सहकारी सोसायटीची निवडणूक (Society Election) चुरशीत झाली. निवडणुकीत सत्ताधारी गटाचे संचालक मंडळ पुन्हा एकदा बहुमताने निवडून आले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या घमासानात एक पोलीस किरकोळ जखमी (Police Injured) झाला आहे, तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे वातावरण थोडे तंग होते. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या राजारामबापू सहकारी सोसायटीची काल निवडणूक झाली.

या चुरशीच्या निवडणुकीत राजारामबापू कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पी. आर. पाटील यांची सत्ता कायम राहिली. यानंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करुन रॅली काढण्यात आली. ही रॅली गावातील मुख्य चौकात आली होती, ज्या ठिकाणी रॅली आली त्याच्या बाजूला विरोधी गटाचे कार्यालय आहे. रॅली काढण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार जल्लोषही सुरू करण्यात येत होता. त्यावेळी अज्ञाताकडून दगडफेक केली गेली. या दगड फेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल आहे.


दगडफेकी, पोलीस जखमी

दगडफेक झाल्यानंतर पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले. दगडफेकीत जखमी झालेला पोलीस कर्मचाऱ्याला घेऊन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले.

पोलीसांची मारहाण सीसीटीव्हीत

ही घटना घडल्यानंतर पोलिसांचा कुमक विरोधी गटाच्या कार्यालयासमोरून पुढे जात होती. त्यावेळी पोलिसांवर हल्ला करता का असा सवाल ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांना करत त्यांच्या डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली. यामध्ये ते रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेऊन उपचार करत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी इस्लामपूर येथे दाखल केले.रात्री उशिरा विरोधी गटाच्या तब्बल वीस जणांच्यावर कुरळप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Pune crime : अट्टल मोबाइल चोरट्यांसह विकत घेणारेही जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Gunratna Sadavarte: आधी गार्डनमध्ये नंतर मध्यरात्री सदावर्तेंच्या घरी बैठक, नागपूरची ती व्यक्तीही बैठकीला हजर, काय घडलं त्या रात्री?; कोर्टात धक्कादायक माहिती उघड

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना न्यायलयीन कोठडी पण ताबा सातारा पोलिसांकडे, प्रकरण काय?