सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात रंगला होड्यांच्या शर्यतीचा थरार; नदी काठी प्रचंड गर्दी

| Updated on: Jul 28, 2022 | 10:31 PM

सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. गेल्या अनेक वर्षापासून सांगलीत होड्या स्पर्धा भरवण्यात आल्या नव्हत्या, होड्यांच्या उत्सुकतेमुळेच या स्पर्धा बघण्यासाठी नदीकाठावर प्रचंड मोठी गर्दी करण्यात आली होती.

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात रंगला होड्यांच्या शर्यतीचा थरार; नदी काठी प्रचंड गर्दी
Follow us on

सांगलीः सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या (Sangli Miraj) इतिहासात पहिल्यांदाच कृष्णा नदी (Krishna River) पात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या. कृष्णेच्या पात्रातला वेगवान होड्यांचा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी कृष्णा काठावर आणि कुरुंदवाड पुलावर नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. मिरजेचे युवा नेते सागर व्हनकडे यांच्या वाढदिवसानिमित्त या होड्यांच्या स्पर्धा (Boat competition) भरवण्यात आल्या होत्या. 9 बोटी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

नदीकाठावर प्रचंड मोठी गर्दी

सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. गेल्या अनेक वर्षापासून सांगलीत होड्या स्पर्धा भरवण्यात आल्या नव्हत्या, होड्यांच्या उत्सुकतेमुळेच या स्पर्धा बघण्यासाठी नदीकाठावर प्रचंड मोठी गर्दी करण्यात आली होती. होड्या स्पर्धांना प्रारंभ झाला की नागरिकांनीही जल्लोष करत स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देते होते.

दहा होड्यांचा स्पर्धेत सहभाग

सांगलीच्या पंचक्रोशीतील गावातील सांगलीवाडी, कसबे डिग्रज, कवठे पिराण, समडोळी या अशा दहा होड्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्वामी समर्थ घाटावरुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. कृष्णेच्या पात्रातील वेगवान होड्यांचा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी कृष्णा काठावर आणि आयर्विन पुलावर मोठी गर्दी झाली होती.

सांगली  रॉयल क्लब ‘प्रथम’

या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 11 हजार तर द्वितीय क्रमांकाला 7 हजार आणि तृतीय क्रमांकाला 5 हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आली होती. प्रथम क्रमांक सांगलीच्या रॉयल क्लब यांनी पटकावला. या स्पर्धेत रॉयल क्लब विजयी झाल्यानंतर प्रचंड गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मिरच्या कृष्णा नदी घाटावर आमदार सुरेश खाडे तसेच महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थित होते.