विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी शिक्षकाला चोप देऊन गावातून हाकलले; शिक्षक बदलून देण्यासाठी शाळा बेमुदत बंद

| Updated on: Jul 30, 2022 | 4:15 PM

शुक्रवारी प्रदाने शाळेत आल्याचे समजताच ग्रामस्थ पुन्हा आक्रमक होऊन त्यांनी हायस्कुलकडे धाव घेतली. यावेळी प्रदाने याला चांगलाच चोपले तर त्याची मोटारसायकल गटारीत पडल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले होते.

विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी शिक्षकाला चोप देऊन गावातून हाकलले; शिक्षक बदलून देण्यासाठी शाळा बेमुदत बंद
Follow us on

सांगलीः शिरोळ तालुक्यातील शिरटी (Shirati Sangli) इथल्या सानिका नामदेव माळी या विद्यार्थिनीच्या मृत्यू (Death of a student) प्रकरणातील संशयित आरोपी शिक्षक निलेश बाळू प्रधानेला आज पालक आणि ग्रामस्थांनी चांगलाच चोप देत शाळेतून हाकलून देण्यात आले. तर संतप्त ग्रामस्थांनी बेमुदत शाळा बंदचा निर्णय घेऊन शाळेला टाळे ठोकून गाव बंद ठेवण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांना संतप्त होत शिक्षकाला गावाबाहेर काढण्यात आले असून वादग्रस्त शिक्षक (Teacher) शिरटीमध्ये नको अशी मागणी आता ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे. शिरटीतील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या शिरटी हायस्कुल शिरटीमध्ये 20 फेब्रुवारी 2020 रोजी सानिका नामदेव माळी या दहावीतील विद्यार्थिनीचा बाटलीतील पाणी पिऊन विषबाधा झाल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील कार्यरत शिक्षक निलेश प्रधाने याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केले होती.

हा शिक्षक शाळेत नको

त्यानंतर प्रदाने याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. शालेय व्यवस्थापन समितीला प्रदाने यास रुजू करून घ्यावा असा आदेश कामगार न्यायालयाने दिला आहे. मात्र प्रदाने यांना शाळेत घेऊ नये अशी येथील नागरिकांची मागणी आहे. दरम्यान आज शुक्रवारी प्रदाने शाळेत आल्याचे समजताच ग्रामस्थ पुन्हा आक्रमक होऊन त्यांनी हायस्कुलकडे धाव घेतली. यावेळी प्रदाने याला चांगलाच चोपले तर त्याची मोटारसायकल गटारीत पडल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले होते. यावेळी प्रदाने याला हकलून देत ग्रामस्थांनी शाळेतील मुलांना बाहेर काढण्यात आले.

शाळा बेमुदत बंद

या घटनेनंतर ग्रामस्थ आणि पालकांनी शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला असून शाळेला टाळे ठोकून शाळा बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी येथील कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न उद्भबवू नये यासाठी प्रदाने शिक्षक आम्हाला नको अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असं इशारा गावच्यावतीने तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिला आहे.

गावात कडक पोलीस बंदोबस्त

सध्या गावात तणावाचे वातावरण असून शिरोळ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या आंदोलनात प्रकाश उदगावे, प्रमोद उदगावे, राहुल सूर्यवंशी, रामदास भंडारे, सतीश चौगुले, सुनील माळी, खांडगोंडा पाटील, प्रकाश उदगावे, अभय गुरव, सचिन खोबरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.