कानडी पोलिसांचा विरोध, शिवसैनिकांनी गनिमी कावा करत भगवा फडकवला

| Updated on: Jan 21, 2021 | 3:40 PM

बेळगाव : सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणाऱ्या लाल-पिवळ्या ध्वजाला विरोध करत बेळगावमध्ये शिवसैनिकांनी भगवा ध्वज फडकवला. कर्नाटकमध्ये प्रवेश नाकालेला असताना शिवसैनिकांनी गनिमी कावा करत बेळगाव जिल्ह्यातील कोनेवाडी गावात हा भगवा ध्वज फडवला.  शिवसेना कार्यकर्ते संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हा ध्वज फडकवला. (Shiv sena leaders hoisted bhagwa flag in Belgaum) बेळगाव प्रश्नावरून […]

कानडी पोलिसांचा विरोध, शिवसैनिकांनी गनिमी कावा करत भगवा फडकवला
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये भगवा ध्वज फडकवला.
Follow us on

बेळगाव : सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणाऱ्या लाल-पिवळ्या ध्वजाला विरोध करत बेळगावमध्ये शिवसैनिकांनी भगवा ध्वज फडकवला. कर्नाटकमध्ये प्रवेश नाकालेला असताना शिवसैनिकांनी गनिमी कावा करत बेळगाव जिल्ह्यातील कोनेवाडी गावात हा भगवा ध्वज फडवला.  शिवसेना कार्यकर्ते संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हा ध्वज फडकवला. (Shiv sena leaders hoisted bhagwa flag in Belgaum)

बेळगाव प्रश्नावरून शिवसेने नेहमीच कठोर भूमिका घेतलेली आहे. कर्नाटकमधील मराठी भाग महाराष्ट्रामध्ये सामील करावा ही शिवसेनेची जुनीच भावना आहे. या भूमिकेच्या अनुषंगाने शिवसेनेने लाल-पिवळ्या ध्वजाला विरोध केला. तसेच बेळगावमध्ये जाऊन तेथे भगवा ध्वज फडकवणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केले होते. त्यानंतर आज (21 जानेवारी) दुपारी शेकडो शिवसैनिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळी गावात पोहोचले होते. मात्र येथे त्यांना कर्नाटक पोलिसांकडून अडवण्यात आले. पोलिसांनी अडवल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलिसांचा विरोध तरीही भगवा फडकवला

यावेळी शिवसैनिकांनी बेगळावमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक या सीमाभागात मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता. मात्र जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी गनिमी काव्याचा मार्ग अवलंबत कोनेवाडी गावात प्रवेश करुन तथे भगवा ध्वज फडकवला.

दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी अडवल्यानंतर गनिमी काव्याचा वापर करत बेळगावात प्रवेश घ्यावा लागेल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता.. मात्र, कर्नाटक पोलीस शिवसैनिकांना बेळगावात प्रवेश द्यायला तयार नव्हते. त्यानंतर शिवसेनेने सीमेवर ठिय्या मांडत जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणाही दिल्या होत्या. शिवसेना कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

संबंधित बातम्या :

अमित शाहांचा बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटण्यास नकार

बेळगावात भगवा फडकवण्यावर शिवसैनिक ठाम, सीमेवर कर्नाटक पोलिसांसोबत झटापट

बेळगाव सीमाप्रश्नावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि येडीयुरप्पांची शिखर परिषद व्हावी : संजय राऊत

(Shiv sena leaders hoisted bhagwa flag in Belgaum)