कल्याणमध्ये शिवसेना सर्वपक्षीय समितीला फाट्यावर मारणार? त्या 14 गावात काय होणार?

| Updated on: Jan 15, 2021 | 7:55 PM

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील ग्रामपंचायत निवडणुकांवर सर्वपक्षीय विकास समितीने सलग तिसऱ्यांदा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे (Shiv Sena to contest gram panchayat elections in 14 villages of Kalyan gramin region)

कल्याणमध्ये शिवसेना सर्वपक्षीय समितीला फाट्यावर मारणार? त्या 14 गावात काय होणार?
Follow us on

ठाणे : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील ग्रामपंचायत निवडणुकांवर सर्वपक्षीय विकास समितीने सलग तिसऱ्यांदा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या समितीत शिवसेनेचे पदाधिकारीदेखील सामील आहेत. मात्र आता येत्या ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना लढवणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. त्यामुळे या 14 गावांमध्ये शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय विकास समिती अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे (Shiv Sena to contest gram panchayat elections in 14 villages of Kalyan gramin region).

नवी मुंबई किंवा ठाणे महापालिकेत 14 गावे समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी 14 गावांनी सलग तिसऱ्यांदा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 14 गावातील ग्रामस्थांनी एक बैठक देखील आयोजित केली होती. यात ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शिवसेनेचे कार्यकर्तेसुद्धा सामील होते. मात्र आता सर्वपक्षीय समितीचा निर्णय झुगारून शिवसेना 14 गावातील ग्रामपंचायत निवडणुका लढवणार असल्याची माहिती जिल्हाप्रमूख गोपाळ लांडगे यांनी दिली.

शिवसेनेच्या या निर्णयानंतर सर्वपक्षीय विकास समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे जर कोणता पक्ष निवडणूक लढत असेल तर त्याच्याविरोधात सर्व पक्षीय विकास समिती आणि मनसे एकत्रित निवडणूक लढवेल, असा पवित्रा मनसेने घेतला आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांना पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

निवडणूक कार्यक्रम कसा असणार?

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

आता निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2020च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2020पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत (Shiv Sena to contest gram panchayat elections in 14 villages of Kalyan gramin region).

हेही वाचा : गावची निवडणूक बिनविरोध करा, 25 लाखांचा निधी मिळवा; आमदार निलेश लंकेंची ऑफर