AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 21 लाखांचा निधी मिळवा, आ. लंकेंच्या पावलावर या आमदाराचं पाऊल!

आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध झाल्यास 21 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 21 लाखांचा निधी मिळवा, आ. लंकेंच्या पावलावर या आमदाराचं पाऊल!
Akshay Adhav
Akshay Adhav | Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:24 PM
Share

जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास 25 लाखांची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास 21 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. (MLA Chimanrao Patil offered development fund for villages to make unopposed Gram Panchayat Election)

गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा, अशी घोषणा पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील चुरस कमी व्हावी आणि गावाचा विकास व्हावा म्हणून आपण अशी घोषणा करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात जेणेकरुन शासनाचा खर्च वाचेल तसंच निवडणूक आणि प्रचार रणधुमाळीपासून गावकरी दूर राहतील आणि गाव विकासाच्या मार्गावर जातील या प्रयत्नातून आपण ही संकल्पणा राबवत असल्याचं चिमणराव पाटील म्हणाले.

तालुक्यातील जी गावे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडेल त्या गावाला 21 लाखांचा निधी देण्यात येईल, असं पाटील यांनी सांगितलं. पहिल्यांदा अशा प्रकारची घोषणा पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केली होती. त्यानंतर आज आमदार चिमणराव पाटील यांनी अशा प्रकारची घोषणा केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि 25 लाख रुपये मिळवा- निलेश लंके

राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणा निलेश लंके यांनी केली आहे. बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

आता निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2020च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2020पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. (MLA Chimanrao Patil offered development fund for villages to make unopposed Gram Panchayat Election)

संबंधित बातम्या

गावची निवडणूक बिनविरोध करा, 25 लाखांचा निधी मिळवा; आमदार निलेश लंकेंची ऑफर

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?