सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचा भाजपला धक्का, अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

| Updated on: Jan 24, 2021 | 5:36 PM

राष्ट्रवादी प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. (Sindhudurg Many Activist Join NCP) 

सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचा भाजपला धक्का, अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
Follow us on

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये आऊटगोईंग सुरु आहे. अनेक राजकीय नेते, आमदार, कार्यकर्ते महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दाखल होत आहेत. आज सिंधुदुर्गातील प्रसिद्ध विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला चांगलाच दणका मिळाला आहेत. (Sindhudurg Many Activist Join NCP)

सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्षाने भाजपसह इतर राजकीय पक्षांना चांगलाच दणका दिला आहे. कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध तरुण विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी नुकतंच राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

कणकवली जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले. हा प्रवेश कार्यक्रम कणकवली-कलमठ येथे पार पडला.

यावेळी कणकवलीतील प्रसिध्द विधितज्ञ ऍड. प्राजक्ता शिंदे, कलमठ येथील अन्वर सुमार साठी, मुख्याध्यापक अनिता फर्नांडिस, साक्षी तर्फे, राजश्री शिंदे ,सुरेखा सावंत, गायत्री शिंदे , रामचंद्र तर्फे, समृद्धी तर्फे, संदीप बोबाटे, प्रवीण कदम, अर्चना विश्वेकर ,सारिका सावंत, मनीषा सावंत, ज्योती साटम इत्यादी व्यक्तींनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

पुण्यात भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. ही चर्चा थांबते न् थांबते तोच आता ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदाराला पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला अस्मान दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.(Sindhudurg Many Activist Join NCP)

संबंधित बातम्या : 

भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!

महाराष्ट्रात मध्यावधीची शक्यता आहे? अनेकांना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नं आताच का?