आधी गर्भातलं बाळ गेलं, मग 19 वर्षीय माऊलीचा मृत्यू, सोलापुरातील घटनेने हळहळ

| Updated on: Mar 30, 2021 | 12:10 PM

गरोदर महिलेला उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिच्या गर्भातील बाळ मृत असल्याचे आढळले. (Solapur Pregnant Lady Dies Baby )

आधी गर्भातलं बाळ गेलं, मग 19 वर्षीय माऊलीचा मृत्यू, सोलापुरातील घटनेने हळहळ
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

सोलापूर : 19 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे. आधी गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. तर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असताना महिलेनेही प्राण सोडले. गर्भवतीच्या मृत्यूमागे नेमकी कोणती गुंतागुंत कारणीभूत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (Solapur Pregnant Lady Dies soon after Baby breathes last in womb)

आधी गर्भातील बाळाचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तांबवे गावात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित गर्भवती महिला आजारी असल्यामुळे तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. घरी आल्यावर महिलेची सासू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे गरोदर महिलेला उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिच्या गर्भातील बाळ मृत असल्याचे आढळले.

शस्त्रक्रियेपूर्वी मातेचाही अखेरचा श्वास

बाळाच्या मृत्यूमुळे महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात येत होते. मात्र त्यादरम्यान तिचाही मृत्यू झाला. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. गरोदर महिलेच्या मृत्यू होण्यामागे नेमकी काय गुंतागुंत निर्माण झाली? याची आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

सोलापुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

दरम्यान, सोलापूर शहरात 408 ठिकाणी तीनपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. सोलापूर शहराच्या अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसत आहे. दहा दिवसात शहरातील 408 ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पुढील दोन दिवसात आणखी 199 ठिकाणी सील करण्यात येणार आहेत. (Solapur Pregnant Lady Dies soon after Baby breathes last in womb)

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये सोलापुरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी शहराच्या काही ठराविक भागांमध्ये रुग्ण आढळले होते. परंतु यंदा मार्च महिन्यात शहराच्या सर्वच भागांमध्ये किमान एक तरी रुग्ण आढळून आला. एखाद्या भागात तीन किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळून आले तर पन्नास मीटरचा परिसर सील करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

रेल्वे-बस प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक

सोलापुरात रेल्वे आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी होणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांनी 72 तासापूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचे अहवाल दाखवणे बंधनकारक आहे, अन्यथा कोरोना चाचणी करणे आवश्यक असेल. कोरोनाचे रुग्ण आणि वाढत्या मृत्यूच्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कडक निर्बंध लावायला सुरुवात केली. महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँडवर पूर्ण चाचणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

प्रसुतीनंतर 20 वर्षीय कोरोनाग्रस्त मातेचा अखेरचा श्वास, बाळ सुरक्षित

मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोना, 35 दिवस मृत्यूशी लढा देत कोव्हिडची लढाई जिंकली

(Solapur Pregnant Lady Dies soon after Baby breathes last in womb)