Solapur Rain : सोलापूरमध्ये माढा आणि पंढरपूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका

| Updated on: Apr 11, 2022 | 12:31 AM

या पावसामुळे बागायतदार आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. द्राक्षे, डाळिंब फळांचे मोठे नुकसान होणार आहे. आधीच कोरोना संकटाने बेजार केले होते. त्यातून सावरतो न सावरतो तोच अवकाळी पावसाने कंबरडे मोडल्याने शेककरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

Solapur Rain : सोलापूरमध्ये माढा आणि पंढरपूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका
सोलापूरमध्ये माढा आणि पंढरपूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका
Image Credit source: TV9
Follow us on

सोलापूर / स्वप्निल उमप-रवी लव्हेकर : माढा आणि पंढरपूर तालुक्याला अवकाळी पावसा (Unseasonal Rain)ने झोडपले. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Loss) झाले आहे. मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने दोन्ही तालुक्यात सुरुवात केली. या पावसामुळे बागायतदार आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. द्राक्षे, डाळिंब फळांचे मोठे नुकसान होणार आहे. आधीच कोरोना संकटाने बेजार केले होते. त्यातून सावरतो न सावरतो तोच अवकाळी पावसाने कंबरडे मोडल्याने शेककरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. (Untimely rains hit Madha and Pandharpur talukas in Solapur)

माढा शहरासह तालुक्यातील कुर्डूवाडी,वडाचीवाडी, मानेगाव, कापसेवाडी यासह सर्वच भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. अनेक गावात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटात रात्री साडे आठ वाजता पाऊस सुरु झाला आहे. तर पंढरपूर तालुक्यातील टाकळी, वाखरी , कासेगाव, खर्डी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली घास हिरावला आहे.

लातुरमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस

लातूर शहर आणि जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस सुरू झाल्याने लोकांची तारांबळ उडाली होती. वाऱ्यामुळे आंबा आणि इतर पिकांचं नुकसान झालं आहे. दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता. पावसामुळे उकाड्यातून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सांगोला तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान

सोलापुरमधील सांगोला तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. तालुक्यातील अकोला (वासुद), कोळे, अजनाळे भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तर अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. कलिंगड, डाळिंब, द्राक्षे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Untimely rains hit Madha and Pandharpur talukas in Solapur)

इतर बातम्या

Video Chandrapur tiger | चंद्रपुरातल्या गोसेखुर्द कालव्यात वाघाचं बस्तान, गर्मीपासून बचावासाठी केली युक्ती

अकोल्यात पावणेदोन कोटी वेळा श्रीराम लिहून केले नामस्मरण!, रजनीकांत कडू यांचा अनोखा उपक्रम