कोल्हापूरातील आणखी एक माजी आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; खासदार धैर्यशील माने यांच्या घरी गिरवले मार्गदर्शनाचे धडे

| Updated on: Jul 25, 2022 | 8:00 PM

माजी आमदार सुजित मिणचेक यांच्याआधी ज्यावेळी माजी आमदार राजेश क्षीरसागरही शिंदे गटात सामील झाले होते, त्यावेळी पोस्टर फाडणे आणि एकमेकांना बघून घेण्याची भाषा झाली होती. त्यामुळे आता पुन्हा एक शिवसेनेचा आमदार शिंदे गटाकडे जात असल्याने कोल्हापूरातील राजकारण आणखी तापणार असल्याचेही दिसत आहे.

कोल्हापूरातील आणखी एक माजी आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; खासदार धैर्यशील माने यांच्या घरी गिरवले मार्गदर्शनाचे धडे
Follow us on

कोल्हापूर: विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad 2022 Result) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सुरु केलेल्या बंडखोरी नाट्याची धग थांबता थांबत नाही असच चित्र सध्या सुरू आहे. बंडखोरी नाट्यनंतर झालेला शपथ विधी आणि त्यानंतर शिवसेनेचे 12 खासदारांचा जाऊन मिळालेला गट आणि आता पुन्हा कोल्हापूरातू माजी आमदारही आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर (Former MLA Sujit Minichekar) शिंदे गटाच्या वाटेवर आहे अशी माहिती सूत्रांनी दिले असल्याचे सांगितले जात आहे.

धैर्यशील मानेंचे मार्गदर्शन

माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी सुजित मिणचेकर यांनी मिणचेकर यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांची विचारपूस केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसैनिकांतून तीव्र असंतोष

कोल्हापूरातील दोन खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे या आधीच शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यानंतर आता माजी आमदार सुजित मिणचेकरही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याने कोल्हापूरातील शिवसैनिकांतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

एकमेकांना बघून घेण्याची भाषा