किरीट सोमय्यांच्या आरोपांवर बोलताना सुप्रिया सुळेंना ट्रक भरुन पुराव्यांची आठवण, म्हणाल्या…

| Updated on: Oct 17, 2021 | 3:58 PM

भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीय. किरीट सोमय्या यांचे आरोप हे प्रसिद्धीसाठी आहेत. याआधीही आमच्यासंदर्भात ट्रक भरून पुरावे असल्याचा दावा करण्यात आला होता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर बोलताना सुप्रिया सुळेंना ट्रक भरुन पुराव्यांची आठवण, म्हणाल्या...
supriya sule kirit somaiya
Follow us on

चंद्रपूर : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीय. किरीट सोमय्या यांचे आरोप हे प्रसिद्धीसाठी आहेत. याआधीही आमच्यासंदर्भात ट्रक भरून पुरावे असल्याचा दावा करण्यात आला होता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. विशेष म्हणजे खोटे आरोप केल्यास खूप प्रसिद्धी मिळते. असे आरोप करुन त्यांना आनंद होतो. हा सेवाभाव आम्ही जोपासला आहे, अशी खोचक टीका सुळे यांनी केली आहे.

किरीट सोमय्या प्रसिद्धीसाठी आरोप करतात

सुप्रिया सुळे आज चंद्रपूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबीयावर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांविषयी प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या यांचे आरोप हे प्रसिद्धीसाठी आहेत. यापूर्वीदेखील असेच आरोप करण्यात आले होते. आमच्याविरोधात ट्रक भरून पुरावे होते असे सांगण्यात येत होते. खोटे आरोप केल्यास त्यांना खूप प्रसिद्धी मिळते तसेच आनंद होतो. त्यामुळे हा सेवाभाव आम्ही जोपासतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे पार्टनर आहेत 

याआधी अजित पवार तसेच त्यांच्या बहिणींवर किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केलेले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवारांच्या 70 बेनामी, नामी संपत्तीत तसेच कंपनीत अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे पार्टनर आहेत. बहिणीच्या नावे संपत्ती, पार्टनशिप, कंपन्या आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही, मग बहिणींच्या नावाने पण बेईमानी केली का ? असा सवालदेखील सोमय्या यांनी केला होता.

अजित पवारांना 100 कोटी रुपये किती वर्षापूर्वी दिले होते?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पवार कुटुंबीयांचे कार्यालय तसेच घरांवर टाकण्यात आलेल्या धाडीवर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले. अजित पवार आणि मित्र परिवाराकडून फक्त चिल्लर सापडली, असं पवार 16 ऑक्टोबर रोजी म्हणाले होते. पवारांच्या याच वक्तव्याचादेखील सोमय्या यांनी आज समाचार घेतला. “मी पवारांना विचारतो. शिवालिक व्हेन्चर्स लिमिटेड, इंडोकॉम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कोण आहे? या दोघांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये किती वर्षापूर्वी दिले होते? त्याची अजित पवारांच्या बेनाई, नामी कंपन्यांमध्ये एन्ट्री लिहिलेली आहे. भविष्यात कधी अजित पवार आपल्या जमिनी विकणार, त्याचा अनसिक्योर अॅडव्हान्स हे 2008 च्या बुकमध्ये एन्ट्री झाली. परंतू त्यावर लिहिलं की यावर कोणतंही व्याज दिलं जाणार नाही. 100 कोटीची ती प्रॉपर्टी आज बाराशे कोटीची झालीय. त्यातील एक दमडी परत दिली का?’ असे किरीट सोमय्या म्हणाले.

 

इतर बातम्या :

सुरेश किसन वीर यांचं निधन, साताऱ्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी

VIDEO | राज ठाकरेंना वॉचमननं ओळखलं नाही म्हणून मारहाण? काहींना अटक, नेमकं प्रकरण काय?

जुळ्या भावांंचा एकत्रच अंत, 25 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, मध्यरात्री एक वाजता नेमकं काय घडलं?

(supriya sule said allegations made by kirit somaiya are falls)