सुरेश किसन वीर यांचं निधन, साताऱ्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी

ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक किसन वीर यांचे पुत्र सुरेश वीर यांचे आज पहाटे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुरेश किसन वीर यांचं निधन, साताऱ्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी
सुरेश किसन वीर

सातारा : ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक किसन वीर यांचे पुत्र सुरेश वीर यांचे आज पहाटे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुरेश वीर  किसनवीरांचा विधायक वारसा चालवायचे

सुरेश वीर हे किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माजी चेअरमन होते. किसनवीरांचा विधायक वारसा ते चालवत होते. कै आ. विलासकाका पाटील उंडाळकर, कै. आ. लक्ष्मणतात्या पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर आज दुपारी वाई येथील कवठे या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे.

साताऱ्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी

साताऱ्याच्या सहकार क्षेत्रात सुरेश वीर यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांच्या निधानाने सहकार क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे. किसन वीर सहकारी साखर कारखाना तसंच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी आपल्या कामाने वेगळी छाप उमटवली. उल्लेखनिय काम करताना बँक सतत अग्रसर ठेवली. आदर्शवत काम करताना दोन्ही संस्थाचा नावलौकिक कसा वाढवता येईल, हे त्यांनी पाहिलं.

कोण होते सुरेश वीर?

ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक किसन वीर यांचे पुत्र सुरेश वीर

किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन

विलास काका उंडाळकर यांचे निकटवर्तीय

साताऱ्यातलं सहकार क्षेत्रात मोठं काम

(Satara Senior leader Suresh kisan Veer pass Away)

हे ही वाचा :

पवारांचा भाजप नेत्याकडून एकेरी उल्लेख, राऊत म्हणतात, यांच्या डोक्याची चौकशी करा!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, गडकरी म्हणतात, ‘विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावा, शाळेत चित्रपट दाखवा’

‘परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु’, रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI